पंतग उडवतांना विद्युत तारांपासून सावधान!

पतंग उडवतांना विजेच्या तारेमुळे विजेचा धक्का लागून अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना घडतात. त्यामुळे विजेच्या तारेपासून सावध राहून उडवणे गरजेचे आहे.

Mumbai
kite
प्रातिनिधिक फोटो

येत्या १५ तारखेला मकरसंक्रांतीचा सण आहे. काही हौशी कलाकार पतंग उडवण्याच्या नादात विजेच्या खांबांवर देखील चढतात. त्यातून अनेकदा लोकांचा जीव जाण्याच्या घटना देखील घटना घडतात. त्यामुळे, पतंग उडवणाऱ्यांना ओव्हरहेड वीज इलेक्ट्रिसिटी वायर्सपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडकडून (एईएमएल ) सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेऊन इशारा देण्यात आला आहे. कारण, ओव्हरहेड इलेक्ट्रिसिटी वायर्सजवळ पतंग उडवणे जीवासाठी धोकादायक तसेच मालमत्तेचे नुकसान करणारे तर आहेच, शिवाय यामुळे पॉवर ग्रिडला हानी पोहोचून संपूर्ण शहर काळोखात जाण्याचा धोकाही आहे.

मकरसंक्रातीची काय आहे नेमकी परंपरा ?

मकर संक्रांतीचा सण यावर्षी १५ जानेवारीला आहे. हा सण साजरा करण्यासाठी लोक एकत्र येऊन पतंग उडवतात. सकाळचे आरोग्यकारक सूर्यकिरण अंगावर पडावेत यासाठी ही पतंग उडवण्याची परंपरा आहे. सूर्याचे हे सकाळची किरणे आरोग्यदायी आणि ड जीवनसत्वाने समृद्ध असतात. हे ऊन त्वचेसाठी चांगले समजले जाते. त्याचप्रमाणे थंडगार हिवाळी वाऱ्यांमुळे झालेल्या अनेक प्रादुर्भावांशी आणि आजारांशी लढण्यासाठी ते आवश्यक आहे. पण, पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा ‘मांजा’ विजेचा सुवाहक आहे. शिवाय, जर मांजाच्या आवरणामध्ये धातूची भुकटी वापरली असेल, तर तो खूपच धोकादायक होतो.

या मांजाचा ओव्हरहेड इलेक्ट्रिसिटी वायर्सना नुसता स्पर्श झाला किंवा तो या तारांच्या वक्रकक्षेत जरी आला तरी तो अतिउच्च म्हणजेच २२०००० व्होल्ट्स इतक्या विद्युतदाबाचे वहन करू शकतो.

याविषयी एईएमएलचे प्रवक्ते म्हणाले, “ यामुळे शॉर्ट सर्किट होऊन केवळ वीजपुरवठा खंडित होणार नाही, तर गंभीर दुखापती होणे, जीव जाणे किंवा इलेक्ट्रिसिटी वायर्सचे तुटून अगदी ग्रिड बंद होईपर्यंत गंभीर घटना होऊ शकतात.”

या भागात पतंग उडवणं टाळा

वर्सोवा, ओशिवरा, उत्तर उपनगरांचा पूर्व भाग म्हणजेच गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरिवली इतर उच्चदाबाचे ओव्हरहेड इलेक्ट्रिसिटी वायर्सचे जाळे आहे अशा भागांत ओव्हरहेड इलेक्ट्रिसिटी वायर्सजवळ पतंग उडवणे टाळा, असा सल्ला देखील प्रवक्ते यांनी दिला आहे.

आपातकालीन परिस्थितीत या नंबरवर करा संपर्क

इलेक्ट्रिसिटी वायर्सजवळ पतंग उडवल्याने काही अप्रिय घटना घडल्यास या भागांतील ग्राहकांनी किंवा नागरिकांनी तात्काळ १९१२२ या एईएमएलच्या डेडिकेटेड पॉवर हेल्पलाइनवर कळवावे, असे आवाहन एईएमएलकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here