घरमुंबईकविता, खुमासदार वाक्यांमुळे आठवले ठरताहेत सभांमधील लोकप्रिय प्रचारक

कविता, खुमासदार वाक्यांमुळे आठवले ठरताहेत सभांमधील लोकप्रिय प्रचारक

Subscribe

खुमासदार वक्तृत्वशैली आणि कविता करण्याची उत्तम जाणं असणारे केंद्रीय नेता रामदास आठवले आता निवडणुकीच्या सभांमध्येही लोकप्रिय ठरू लागले आहेत.

खुमासदार वक्तृत्वशैली आणि कविता करण्याची उत्तम जाणं असणारे केंद्रीय नेता रामदास आठवले आता निवडणुकीच्या सभांमध्येही लोकप्रिय ठरू लागले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले हे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे लोकप्रिय स्टार प्रचारक ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच्या सभांमध्ये प्रमुख वक्ते म्हणून रामदास आठवले आकर्षण ठरले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक उमेदवारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर सर्वाधिक मागणी असणारे महत्वाचे स्टार प्रचारक म्हणून रामदास आठवले यांचेच नाव पुढे आले आहे.

मुंबईतील महासभेतील भाषणाकडे लक्ष 

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यांचे मतदान पार पडले आहे. आता तिसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. मुंबईत येत्या २६ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची महायुतीच्या प्रचाराची सभा वांद्रे येथे होत आहे. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे तीन महायुतीचे महानेते महायुतीच्या बुलंद तोफा ठरले आहेत. या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचाराची शुभारंभाची पहिली जाहीर सभा २४ मार्चला कोल्हापूर येथे झाली. त्या सभेत रामदास आठवले यांचे वक्तृत्व त्यातील शीघ्रकविता, कोपरखल्यांमुळे, प्रेक्षकांच्या टाळ्या, हशा मिळवीत सर्वाधिक प्रेक्षकांची दाद मिळवणारे भाषण ठरले. त्यानंतर राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेतच्या सर्व जाहीर प्रचार सभांना रामदास आठवले उपस्थित राहिले होते.

- Advertisement -

उमेदवारांकडून त्यांच्या उपस्थितीची मागणी 

राज्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांना रामदास आठवले यांची एकतरी जाहीर प्रचार सभा आपल्या मतदारसंघात हवी आहे. भाजपतर्फे रामदास आठवलेंना अनेक सभांसाठी चार्टर्ड प्लेन तर कधी हेलिकॉप्टर पुरवले जात आहे. राज्यातील शिवसेना भाजपच्या उमेदवारांकडून आपल्या विजयासाठी रामदास आठवले यांनी प्रचार सभा घ्यावी, रोड शो कारवा, अशी मागणी वाढत आहे. त्यामुळे राज्यातील महायुतीच्या स्टार प्रचारकांमध्ये रामदास आठवले सुपरस्टार प्रचारक ठरले आहेत.

हेही वाचा –

राज ठाकरेंच्या सभेला मुंबईत परवानगी

- Advertisement -

मुख्यमंत्री – शरद पवारांमध्ये चड्ड्यांवरून झाली टीका-टिप्पणी!

‘विकास हरवला आहे’; आव्हाड यांनी दिली जाहिरात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -