घरमुंबईदक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ जिंकायच्या दृष्टीने कामाला लागा - रामदास आठवले

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ जिंकायच्या दृष्टीने कामाला लागा – रामदास आठवले

Subscribe

रामदास आठवले यांनी आपल्या निवडणूक प्रचारास सर्वप्रथम सुरुवात केली आहे. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची त्यांनी अधिकृत घोषणा केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीला सहा महिन्यांचा अवधी असला तरी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या निवडणूक प्रचारास सर्वप्रथम सुरुवात केली आहे. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची त्यांनी अधिकृत घोषणा केलेली आहे. रिपाइंच्या दक्षिण-मध्य मुंबई जिल्हा जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करून आठवले यांनी आपल्या निवडणूक प्रचारास प्रारंभ केला आहे. भाजप-शिवसेना यांची युती होवो अथवा न होवो मात्र आपल्या बळावर भाजपच्या साथीने दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ जिंकण्याच्या दृष्टीने रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी प्रचार कार्यास लागावे, असे आवाहन आठवले यांनी केले. चेंबूर मैत्रिपार्क येथील कॅकसन हाऊस येथे रिपब्लिकन पक्षाचे दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाच्या प्रशस्त जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिपाइं महिला आघाडीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सीमा आठवले, कुमार जित आठवले, रिपाइंचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘राज्यसभेत जीव रमत नाही’

राज्यसभेत जीव रमत नाही सांगत रिपब्लिकन पक्षाचे लोकसभेत अस्तित्व निर्माण करण्यासाठी लोकसभा निवडणूक लढण्याचा आपण निर्णय घेतला आहे. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे राहुल शेवाळे प्रतिनिधित्व करीत आहेत. मात्र आता या मतदारसंघातून आपण निवडणूक लढणार असल्याने शिवसेनेने त्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करावे. शिवसेना-भाजप यांची युती व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सेना-भाजपची युती लोकसभा निवडणुकीत निश्चित होईल, असा मला विश्वास असून युती झाल्यास दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात पालघर लोकसभा मतदार संघ शिवसेनेसाठी सोडला जावा, असा प्रस्ताव आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवशक्ती-भीमशक्ती युतीचे स्वप्न मी व माझ्या रिपब्लिकन पक्षाने पूर्ण केले असल्याने शिवसेना माझ्यासाठी जरूर दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सोडेल,असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

निश्चित मतदारसंघ म्हणून आठवलेंनी निवड केली

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात यापूर्वी १९९८ मध्ये रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी लढवून आठवले विजयी झाले होते. त्यामुळे या मतदारसंघाची आपला निश्चित एक मतदारसंघ म्हणून आठवले यांनी निवड केली आहे. या मतदारसंघात त्यांनी कामाला सुरुवात केली असून आज जनसंपर्क कार्यलयाचे थाटात उद्घाटन करण्यात आले आहे. चेंबूर आणि अनुशक्तीनगर हे दोन रिपाइंचे बालेकिल्ले या मतदारसंघात असल्याने रिपाइं कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास आणि उत्साह पाहायला मिळत आहे. रिपाइंच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनास मुस्लिम कार्यकर्त्यांनीच पुढाकार घेतला होता. मोठया प्रमाणात मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने या मतदारसंघात रिपब्लिकन पक्षातर्फे दलित मुस्लिम एकजुटीचे सूत्र राबविण्यात येत असल्याचे चित्र दिसत होते. ‘एकत्र आल्याने दलित मुसलमान, रिपाइंलाच मिळणार विजयाचा मान’, अशी चारोळी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनपर भाषणात आठवलेंनी सादर केली.


हेही वाचा – दोषी असतील तर एम. जे. अकबरांवर कारवाई व्हावी- रामदास आठवले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -