भिवंडीतील चटोर गल्लीत रमजान निमित्त खवय्यांची गर्दी

रमजान महिन्यात भिवंडीतील चटोर गल्लीत मांसाहारी विविध पदार्थ खाण्यासोबतच मिठाई चे विविध प्रकार खाण्यास मिळत असल्याने मुस्लिम धर्मीय या भागात रात्रीच्या वेळी रमजान महिन्यात नेहमीच वावरताना दिसतात

mumbai

रमजान महिना म्हणजे इस्लाम धर्मीय नागरिकांसाठी पवित्र असा महिना ,तब्बल तीस दिवस रोजे उपवास करून अल्लाची इबादत केली जाते . सकाळी सेहरी पासून ते सायंकाळी इफ्तार पर्यंत दिवसभर उपवास पकडल्या नंतर रात्रभर खाऊन भूक भागवून पुन्हा दुस-या दिवशी पहाटे रोजा उपवासास सुरवात होते. दरम्यान सायंकाळी इफ्तार प्रसंगी खजूर व फळाहार घेऊन उपवासाची सांगता होते व त्यानंतर रात्री तराबीच्या नमाजी नंतर असंख्य भिवंडीकरांची पावले आपली भुगा चमचमीत खाण्याने भागविण्यासाठी वळतात ती जुना ठाणा रोड वरील चटोर गल्ली कडे.

Bhiwandi ramjan special

भिवंडी या मुस्लिम बहुल शहरात रमजान महिन्यात मोठी रेलचेल असते, असंख्य रोजेदार आपला उपवास संपल्या नंतर रात्रभर फिरत असतात या दरम्यान आपल्या पोटाची भूक भागवीत असताना आपल्या जिभेचे लाड चविष्ट खाण्याने पूर्ण करतात त्यासाठी भिवंडी शहरातील चटोर गल्ली हि सुप्रसिद्ध असून या गल्लीत नॉनव्हेज च्या विविध प्रकारांसोबतच मिठाईचे असंख्य प्रकार खास रमजान महिन्यात खाण्यास मिळत असल्याने असंख्य नागरिकांची पावले रात्री उशिरा या चटोर गल्ली कडे वळतात.या रस्त्यावरील जुना ठाणारॊड येथील अयुब मिठाईवाला हा गोड मिठाईच्या पदार्थांसाठी मागील पन्नास वर्षांपासून सुप्रसिद्ध असून येथे खास रमजान मध्ये मालपोआ व मातीच्या वाटीतील फेरणी खाण्यासाठी असंख्य नागरिक गर्दी करून असतात . त्यामुळे या ठिकाणी रात्रभर ग्राहकांची गर्दी दिसून येते परंतु ग्राहकांचे समाधान करण्यात आम्ही यशस्वी होत असल्याने ग्राहकांचा ओढा मालपोआ व फेरणी खाण्यासाठी आपसूक अयुब मिठाईवाला या दुकानाकडे वळतात अशी माहिती असिफ भाई यांनी दिली.

Bhiwandi ramjan special

रमजान महिन्यात भिवंडीतील चटोर गल्लीत मांसाहारी विविध पदार्थ खाण्यासोबतच मिठाई चे विविध प्रकार खाण्यास मिळत असल्याने मुस्लिम धर्मीय या भागात रात्रीच्या वेळी रमजान महिन्यात नेहमीच वावरताना दिसतात येथील चविष्ट खाद्यप्रदार्थाने सर्वानाच आनंद मिळत असल्याने आम्ही येथे दररोज येत असल्याची माहिती चटोर गल्लीत आपल्या जिभेचे लाड पुरविण्यासाठी आलेल्या एका खवय्याने दिली आहे . भिवंडीकरांना रमजान महिन्यात चटोर गल्लीत विविध मांसाहारी खाद्यपदार्थांसह गोड़ मालपोआ, गवळा , फेरणी या खाद्यपदार्थांना मोठी मागणी असल्याने मुस्लिम धर्मीय च नव्हे
तर हिंदू धर्मीय सुध्दा मोठ्या संख्येने या पदार्थांचा संवाद घेण्यासाठी या ठिकाणी आपल्या जिभेचे लाड पुरविण्यासाठी खवय्येगिरी साठी येत असतात त्यामुळे रात्री पासून ते पहाटे सेहरी पर्यंत या चटोर गल्लीत मोठी वर्दळ होत आहे.

Bhiwandi ramjan special