घरमुंबईमेट्रो ३ साठी नवे एमडी रुजू; रणजित सिंह देओल यांनी स्वीकारला पदभार

मेट्रो ३ साठी नवे एमडी रुजू; रणजित सिंह देओल यांनी स्वीकारला पदभार

Subscribe

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार आज रणजीत सिंह देओल यांनी स्वीकारला. १९९८ चे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी देओल आता सर्वात आव्हानात्मक कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्ग ३ चे नेतृत्व करतील. रणजीत सिंह देओल यांनी अश्विनी भिडे यांच्याकडून आज पदभार स्वीकारला. यावेळी दोघांनी एकमेकांना नवीन कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

वेगवेगळ्या पदावर काम केल्याचा २० वर्षांहून अधिक अनुभव देओल यांच्याकडे आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष असताना अपघात टाळण्यासाठी त्यांनी बस बांधणीसाठी हलक्या स्टीलचा वापर करण्याची संकल्पना दिली होती. त्यांच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कारकिर्दीदरम्यान व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम आणि प्रवासी माहिती यंत्रणा कार्यान्वित झाल्या. शिवशाही बसेस, स्मार्ट कार्ड्स, ई-टिकिटिंग तसेच संवेदनशील बस स्थानकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता.

- Advertisement -

देओल यांची कारकिर्द

रणजीत सिंह देओल यांनी इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीची पदवी संपादन केली असून मॅक्सवेल स्कूल ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन, न्यूयॉर्क येथून एक्झिक्युटिव्ह मास्टर्स इन पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन ही पदवी संपादन केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -