संतापजनक! महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेहावर केला बलात्कार

नालासोपाऱ्यात टेम्पोत सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

Nalasopara
rape of body after murder of woman in nalasopara
धक्कादायक: COVID Care Centre च्या कर्मचाऱ्यानेच केला महिलेचा विनयभंग!

सध्या देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असताना दुसरीकडे मात्र, एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेहावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना नालासोपाऱ्यात उघडकीस आली. क्षुल्लक वादातून एका दुकानदाराने महिलेची हत्या केल्याचे उघड झाले. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेची हत्या केल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसांनी याच परिसरातील शिवा नगरम चौधरी (३०) याला अटक केली आहे.

नेमके काय घडले?

नालासोपाऱ्यात आरोपी शिवा याचे प्रिन्स नोव्हेल्टी हे दुकान आहे. तो दुकानात मागील आठ महिन्यांपासून एकटाच राहत होता. या दुकानात ही महिला समान खरेदी करण्यास गेली होती. त्या दरम्यान, दुकानदार शिवा आणि पीडित महिलेची बाचाबाची झाली. त्यानंतर याचे रुपांतर झटापटीत झाले. शिवाने संबंधित महिलेचे केस ओढत तिला आतल्या रूममध्ये नेले आणि तिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिच्या गळ्यावर आरोपीने चाकूने वार केले.

या घटनेतील धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे आरोपी शिवाने हत्या केल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास एका मोठ्या प्लास्टिकच्या पिशिवीत तिचा मृतदेह भरून चंदन नाका येथे उभ्या असलेल्या एका टेम्पोमध्ये फेकून दिला, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर यांनी दिली आहे. अखेर पोलिसांना नालासोपाऱ्यात टेम्पोत सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचा छडा लावण्यात यश आले आहे.


हेही वाचा – कोरोनाला रोखण्यासाठी अटीतटीची शर्थ