घरमुंबईमुंंबईत मनोरूग्ण तरूणीवर बलात्कार

मुंंबईत मनोरूग्ण तरूणीवर बलात्कार

Subscribe

मुंबईतील उपनगरामध्ये एका मनोरूग्ण तरूणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. १५ नोव्हेंबरपासून तरूणी बेपत्ता होती.

मुंबईमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. मुंबईतील एका मनोरूग्ण तरूणीवर बलात्कार झाल्यानं खळबळ उडाली आहे. पीडित तरूणी ही मागील आठवडाभरापासून बेपत्ता होती. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरूणी मुंबईतील एका झोपडपट्टीमध्ये राहत असल्याचं कळतंय. बलात्काराच्या या घटनेनं महिला सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उभं राहिलं आहे. १५ नोव्हेंबरपासून बेपत्ता झालेल्या तरूणीचा शोध घेतला गेला. पण, तिचा शोध काही लागला नाही. अखेर पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. तपासादरम्यान तरूणी मालवणी परिसरात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी मालवणी भागातून तरूणीला ताब्यात घेतलं. दरम्यान चौकशी सुरू असताना तरूणीनं आपल्यावर बलात्कार झाल्याची माहिती पोलिसांना दिली.

यानंतर पोलिसांनी पीडित तरूणीला तपासासाठी रूग्णालयामध्ये पाठवलं आहे. याप्रकरणात पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, नराधमाला लवकरच अटक करू असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. पीडित तरूणी ही मागील तीन वर्षामध्ये चौथ्यांदा घरातून बेपत्ता झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -