घरताज्या घडामोडीडोंबिवली पुन्हा एकदा हादरली, एमआयडीसीत केमिकल फॅक्टरीमध्ये स्फोट!

डोंबिवली पुन्हा एकदा हादरली, एमआयडीसीत केमिकल फॅक्टरीमध्ये स्फोट!

Subscribe

डोंबिवलीत पुन्हा एकदा एमआयडीसी परिसर हादरला आहे. कारण एमआयडीसीत पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. एमआयडीसीच्या फेज २ मधील अंबर केमिकल फॅक्टरीमध्ये स्फोटाचा भयंकर आवाज आला. या स्फोटाच्या आवाजाने आसपासच्या परिसरातील नागरिक हादरले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण स्फोटामुळे कंपनीचा काही भाग कोसळला आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या प्रोबेस कंपनीतील स्फोटामुळे मोठी हानी झाली होती.

- Advertisement -

सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले असून . यामध्ये कोणाला दुखापत झाली किंवा नाही याबाबत अद्याप ठोस माहिती मिळाली नसून शेजारील कंपनीचे नुकसान झाल्याचे समजते आहे. तर कंपनीतील रिऍक्टरच्या गॅसकेटचे तुकडेही शेजारील।इमारतींमध्ये जाऊन पडल्याची माहिती समोर येत आहे.

डोंबवलीतील शहरी वस्तीच्या जवळ असलेल्या एमआयडीसीचा प्रश्न सोफ्टाच्या निमित्ताने पुन्हा समोर आला आहे. वाढते प्रदुषण, गुलाबी रंगाचा पाऊस अशा घटनांमुळे या आधीच एमआयडीसीतील केमिकल कंपन्या येथून स्थलांतरीत कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून केली जात होती. या आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथील कंपन्या हलवण्याचे आदेश दिले होते.

- Advertisement -

हे ही वाचा – Sushant Suicide Case: बिहारच्या IPS अधिकाऱ्याच्या होम क्वारंटाईन निषेधार्थ भाजप आक्रमक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -