योग्य उमेदवार, योग्य मत

Mumbai
दिग्दर्शक -देवेंद्र पेम

दिग्दर्शक -देवेंद्र पेम…

मतदान न करणारा माणूस सापडणे तसे कठीण आहे. प्रत्येकाला या मतदानाचे महत्त्व कळलेले आहे. फक्त मतदारांमध्ये थोडासा विचलितपणा वाढलेला आहे. इतरवेळी तो ठाम असतो, परंतु जेव्हा मतदान करण्याची पाळी येते त्यावेळी मात्र तो संभ्रमात पडतो. उमेदवाराला आपले मत द्यायचे नसेल तर त्यासाठी नोटा हे बटण दिलेले आहे. मतदार जर साशंक असेल तर त्याने निदान नोटाचे बटण दाबून आपला अधिकार बजावला पाहिजे.

यालासुद्धा एक कारण आहे, जेव्हा उमेदवार सत्तेवर येतो आणि त्याला आपल्या कामाची जाण रहात नाही त्यावेळी आपल्याला पश्चाताप होण्याची शक्यता असते. या पश्चातापापासून सुटका म्हणजे योग्य उमेदवार योग्य मत. हे सर्वांनी पाळले पाहिजे. महाराष्ट्र शासन राज्य नाट्य स्पर्धा, व्यावसायिक नाट्यस्पर्धा आणि त्याशिवाय नाटकाला अनुदान या गोष्टी उत्तमपणे राबवत आहे. परंतु, त्यासाठी निर्मात्याला जी धडपड करावी लागते त्याची समज सत्तेवर असलेल्या मंत्र्यांना नसल्यामुळे नाट्य निर्मात्यांत थोडीशी नाराजीही पहायला मिळते.

जे वर्षानुवर्षे नाटकाची निर्मिती करत आहेत, त्यांना नाट्य प्रयोगातील बारकावे माहीत आहेत पण जे नव्याने या निर्मितीक्षेत्रात आलेले आहेत, त्यांनी काय करायचे हा प्रश्न थोडासा चिंतेचा आहे. सत्तर ते नव्वद टक्के निर्माते अशा अडचणींना सामोरे जात आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here