घरमुंबईबृहत आराखड्यामधील बदलांसाठी सूचनांचा पाऊस

बृहत आराखड्यामधील बदलांसाठी सूचनांचा पाऊस

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२३-२४ या पाच वर्षाकरिता मुंबई विद्यापीठाचा पंचवार्षिक बृहत आराखडा व वर्ष २०१९-२० करिता वार्षिक आराखडा आज संपन्न झालेल्या अधिसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सिनेट सदस्यांनी यावर सविस्तर चर्चा करुन हा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठातील नव्या कॉलेजांसाठी आवश्यक असलेल्या बृहत आराखड्यांमधील बदलांसाठी आज अनेक सूचनांचा पाऊस सिनेट सदस्यांनी केला. मुंबई उपनगर व नवी मुंबईत औद्योगिक क्षेत्र असल्याने याक्षेत्रात महिलांसाठी कॉलेज आणि ललित कला कॉलेज यासारख्या अनेक सूचना शनिवारी सिनेट सदस्यांकडून करण्यात आल्या असून नव्या शैक्षणिक वर्षासाठीचा आणि पंचवाषिक बृहत आराखडा शनिवारी सिनेट सभेत मंजूर करण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२३-२४ या पाच वर्षाकरिता मुंबई विद्यापीठाचा पंचवार्षिक बृहत आराखडा व वर्ष २०१९-२० करिता वार्षिक आराखडा आज संपन्न झालेल्या अधिसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सिनेट सदस्यांनी यावर सविस्तर चर्चा करुन हा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार पाच वर्षाचा बृहत आराखडा तयार करताना समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणारे उद्योजक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, विद्यार्थी, शिक्षक, पालक, प्राचार्य, संस्थाचालक, शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी, शासकीय अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी आदीच्या सूचना ऑनलाईन तसेच ऑफलाईन सर्वेक्षण प्रश्नावलीच्या स्वरुपात मागवून घेतल्या होत्या. विद्यापीठाला एकूण २१३५ सूचना प्राप्त झाल्या. या सूचनांचे विश्लेषण करून बृहत आराखडा तयार करण्यात आला. आज हा बृहत आराखडा मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी यांनी अधिसभेच्या बैठकीत मांडला. या प्रसंगी अधिसभेच्या अनेक सदस्यांनी आपल्या सूचना बैठकीत मांडल्या. अधिसभेच्या सदस्यांनी दिलेल्या योग्य सूचनाचा अंतर्भाव या बृहत आराखडयामध्ये केला जाईल असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

बृहत आराखड्यातील महत्वाच्या शिफारशी
-औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणार्‍या युवकांसाठी रात्र कॉलेज
-ठाणे जिल्ह्यामध्ये विशेषतः कल्याण मधील ग्रामीण भागामध्ये व भिवंडी तालुक्यात विधी, आर्कीटेक्चर व फार्मसी कॉलेज
-रत्नागिरीत नेव्हल आर्कीटेक्चर व मरीन इंजिनिअरिंग (शिप बिल्डींग) व आर्कीटेक्चर कॉलेज
– सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये हॉस्पिटॅलिटी मॅनजमेन्ट व ललित कला कॉलेज
-पालघर हा आदिवासी जिल्हा असल्याने येथे उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे
-वसई व पालघर सोडून इतर सर्व तालुक्यामध्ये एक कॉलेज
-तारापूर- बोईसरमध्ये औद्योगिक क्षेत्र वाढत असल्याने येथील युवकासाठी रात्र कॉलेज
-आदिवासीची संस्कृती व विशेषतः वारली चित्रकला लक्षात ठेवून ललित कला कॉलेज

नाणारवरुन युवा सेना आक्रमक
दरम्यान, राज्यात होऊ घातलेल्या नाणार प्रकल्प लक्षात घेता याठिकाणी ही नवा अभ्यासक्रम सुरु करण्याची मागणी यावेळी काही प्राध्यापकांकडून करण्यात आली. मात्र यावरुन युवा सेनेने आक्रमक पवित्रा धारण करुन नाणार प्रकल्प होणार नसून त्याचे शब्द कामकाजातून वगळण्याची मागणी युवा सेनेचे सदस्य वैभव थोरात यांनी केली. त्यामुळे सिनेटमध्ये काही काळ तणाव पसरला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -