घरमुंबईकामाठीपुर्‍यात अनलॉकसाठी 'लालबत्ती'! हजारो रहिवाशांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कामाठीपुर्‍यात अनलॉकसाठी ‘लालबत्ती’! हजारो रहिवाशांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Subscribe

लॉकडाऊननंतर आता नव्याने अनलॉक सुरू होत असताना कामाठीपुरा येथील रेड लाइट परिसरातील वेश्यागृहे सुरु झाल्यास कोरोना विषाणूचा शिरकावा होण्याची शक्यता आहे. हा धोका टाळण्यासाठी कामाठीपुरा येथील एक हजार पेक्षा जास्त रहिवासी आणि व्यावसायिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबई दक्षिणचे खासदार अरविंद सावंत आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल चहल यांना कामाठीपुरातील ग्राहकांवर बंदी आण्यासाठी पत्र लिहलेले आहे.

गर्दीच्या गल्ल्यांसाठी आणि रेड लाईट क्षेत्रासाठी कामाठीपुरा कुप्रसिद्ध आहे. हा परिसर दाटीवाटीचा असला तरी कोरोना संसर्गावर नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे. जेव्हा मुंबईमध्ये संपूर्णपणे लॉकडाऊन होते. त्या काळात कामाठीपुरा येथील रहिवासी आणि व्यावसायिक एकत्र आले. त्यांनी सर्व कामे बंद केली गेली पाहिजेत व लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जावे, असा निर्णय घेतला. सामुदायिक प्रयत्नांचा परिणाम म्हणून, मुंबईने एक लाख पॉझिटिव्ह केसेस ओलांडल्या आहेत. तरीही कामठीपुरा मधील हा आकडा हजाराच्या आत ठेवण्यात यशस्वी झाला आहे. त्यामुळे हा भाग सद्यस्थितीत ग्रीन झोनमध्ये मोडतो आहे. मात्र आता लॉकडाऊन होईपर्यंत ग्राहकांची वरदळ नव्हती आणि सर्व काही नियंत्रणात होते, असे स्थानिकांचे मत आहे. परंतू अनलॉक झाल्यापासून, या भागात वारंवार लैंगिक सुखासाठी येणार्‍या ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. ग्राहक शहराच्या विविध भागातून कामाठीपुरा-फोकलँड परिसरात येतात. कदाचित यातील काही जण कोरोना विषाणूचे संभाव्य वाहक असू शकतात. त्यामुळे तेथील नागरिकांना भीती वाटते की देहविक्री करणार्‍यांना संसर्ग होण्यापूर्वी आणि त्या क्षेत्रात विषाणूंचा अनियंत्रित प्रसार होण्यापूर्वी ही वेळ सध्या अतिदक्ष राहण्याची आहे, असे तेथील नागरिकांना वाटते.

- Advertisement -

मोठ्या प्रमाणात धोका

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका मीडिया रिपोर्टनुसार, पश्चिम बंगालमधील लैंगिक कामगारांसमवेत कार्यरत असलेली सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था ‘दरबार महिला सामन्य समिती’ (डीएमएससी) च्या डॉक्टर आणि मुख्य सल्लागार समरजित जना यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन उठले असून, लैंगिक कर्मचार्‍यांना लवकरात लवकर काम करण्यास परवानगी दिल्यास हे खूप धोक्याचे ठरेल. त्यांच्या कामाच्या स्वभावामुळे आणि जेथे ते राहतात त्या गर्दीमुळे, एकेक केस शंभरात संक्रमित होऊ शकते.

पुरुषांना थांबवणे महत्वाचे

कोरोनापासून समुदायाला सुरक्षित ठेवण्यासाठी, आम्ही आमच्या येथील शाळा बंद ठेवल्या आहेत आणि आम्ही आमच्या मुलांना बाहेर जाऊ देत नाही, खेळायला ही पाठवत नाही. आमच्यापैकी बर्‍याच जणांनी कोरोनाच्या भीतीपोटी या परिसरातील दुकानेही बंद केली आहेत. मात्र येथे ग्राहकांना मुक्तपणे फिरण्याची परवानगी दिली जात आहे. आमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आमच्या भागात शरीर सुखासाठी येणार्‍या पुरुषांना थांबवणे महत्वाचे आहे. आम्हाला वाटते की प्रशासन आणि अधिकारी याची दखल नक्की घेतील. अशी प्रतिक्रिया कामाठीपुरा कायाकल्प संघर्ष मंडळचे सदस्य रुकेश गिरोला यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा –

सोशल डिस्टन्सिंग पाळत दहिहंडीचे थर लावणार – गोपिकांचा निर्धार

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -