स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठ नागरिकांच्या फेर्‍या

Mumbai

राज्यातील आगार आणि बस स्थानकांवर सारखीच परिस्थिती राज्यात सुमारे 17 लाख प्रवाशांची एसटीने स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. मात्र, नोंदणीनंतर स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना फेर्‍या माराव्या लागत आहे. एसटीच्या मुंबई सेंट्रल या मुख्यालयासह राज्यातील आगार आणि बस स्थानकांवर सारखीच परिस्थिती असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

एसटीतील कागदपत्रांची पद्धत बंद करून ऑनलाईन पद्घतीने प्रवाशांना स्मार्ट करण्यासाठी एसटीने आधार संलग्न स्मार्ट कार्ड योजना सुरू ेकेली. त्यासाठी खासगी कंपनीला कंत्राट दिले होते. सुरूवातीला स्मार्ट कार्ड नोंदण्यासाठीच अडचणी येत होती. त्यामुळे ज्येष्ठ प्रवाशांनाही रांगेमध्ये दिवसभर उभे राहावे लागले होते. त्यानंतर आता, नोंदणी झाल्यानंतर आता, स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी सुद्धा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई सेंट्रल बस स्थानकांवर दैनंदिन ज्येष्ठ प्रवासी स्मार्ट कार्डसाठी फेर्‍या मारत असून, अशी परिस्थिती राज्यातील सर्वच ठिकाणी असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here