घरमुंबईप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ प्रा. शशिकुमार चित्रे यांचे निधन

प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ प्रा. शशिकुमार चित्रे यांचे निधन

Subscribe

सुप्रसिद्ध गणिती आणि खगोलशास्त्रज्ञ शशिकुमार मधुसूदन चित्रे यांचे आज सोमवारी वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील कोकीलाबेन अंबानी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मानाचा पद्मभूषण पुरस्काराने त्यांना २०१२ साली भारत सरकारमार्फत गौरविण्यात आले होते. चित्रे यांच्या कारकीर्दीची सुरुवात लीड्स विद्यापीठात व्याख्याते म्हणून झाली. तेथे ते ३ वर्षे होते. नंतर त्यांना कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या संस्थेमध्ये काम करण्यासाठी विशेष अभ्यासवृत्ती मिळाली. ते १९६७ मध्ये भारतात परतले आणि मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये रुजू झाले. २००१ मध्ये निवृत्त होईपर्यंत ते याच संस्थेत कार्यरत राहिले.

चित्रे यांचे योगदान

चित्रे यांचे संशोधन मुख्यत: सौर भौतिकशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र या विषयांशी संबंधित आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे दुर्बिणीतून निरीक्षण केले असता त्यावर काळ्या रंगाचे सूक्ष्म ठिपके आढळून येतात. त्यांना सौर डाग असे म्हटले जाते. या डागांची संख्या तसेच त्यांचे स्थान यात बदल होत असतो. याशिवाय सूर्यामध्ये अनेक घडामोडी घडत असतात. सौर डाग आणि या घडामोडी यांचा एक आवृत्ति-काल असतो. या सगळ्या घटना सूर्याच्या बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे घडतात. हे क्षेत्र आणि त्यात होणारे बदल अतिशय गुंतागुंतीचे असतात. चित्रे यांचे संशोधन या बदलांशी संबंधित आहे. सूर्यामध्ये घडणाऱ्या घडामोडींचा परिणाम प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष रीतीने पृथ्वीवर होत असतो. त्यामुळे या संशोधनाचे महत्त्व मोठे आहे. बहिर्गोल भिंगामुळे प्रकाशकिरण वाकतात हे आपल्याला माहीत आहे. अंतराळातील एखाद्या वस्तूचे वस्तुमान प्रचंड असेल तर त्या वस्तुच्या जवळून जाणारे प्रकाश किरणही वाकतात असे आढळून आले आहे. त्या वस्तुचे गुरुत्वाकर्षण प्रचंड असल्याने असे घडते. या परिणामाला गुरूत्वीय भिंग परिणाम असे म्हणतात.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -