घरमुंबईविद्यावेतनासाठी निवासी डॉक्टरांचा काळ्या फिती लावून निषेध!

विद्यावेतनासाठी निवासी डॉक्टरांचा काळ्या फिती लावून निषेध!

Subscribe

विद्यावेतनाच्या मुद्द्यावरुन सुरु झालेल्या या राज्यव्यापी मोहिमेला पाठिंबा दर्शवण्यासाठी, आज जे जे आणि सेंट जॉर्ज या सरकारी हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून आरोग्य सेवा बजावली.

विद्यावेतनाच्या मुद्द्यावर राज्यासह मुंबईतील डॉक्टरांनीही निषेध करायला सुरुवात केली आहे. गुरुवारी पालिकेच्या केएईएम या हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला. त्यानंतर, शुक्रवारी सरकारी हॉस्पिटल्सपैकी सर जे.जे हॉस्पिटल आणि सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून निषेध दर्शवत आंदोलनात सहभाग घेतला. गेल्या ४ दिवसांपासून राज्यातील अनेक हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांनी विद्यावेतन वेळेवर मिळावं यासाठी फळ विक्री मोहिम सुरू केली आहे. त्या फळ विक्रीला मुंबईतील डॉक्टरांनी ही पाठिंबा दर्शवला. त्यानुसार, २५ तारखेला पालिकेच्या सायन हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी हॉस्पिटलच्या आवारात फळं विकली. २६ तारखेला नायर हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून निषेध केला आणि २७ तारखेला म्हणजेच गुरुवारी केईएममध्ये निवासी डॉक्टरांनी फळ विकत राज्यभरात सुरू झालेल्या मोहिमेला पाठिंबा दिला. तर, शुक्रवारी याच मोहिमेत जे जे आणि सेंट जॉर्ज या सरकारी हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून आरोग्य सेवा बजावली.

राज्यातील ४ मेडिकल कॉलेजमधील हजार निवासी डॉक्टरांना विद्यावेतन न मिळाल्याने या कॉलेजमधील डॉक्टर्स सरकारविरोधात निषेध व्यक्त करत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेल्या विद्यावेतनामुळे निवासी डॉक्टरांचा संताप होत आहे. त्यामुळे जर शुक्रवारच्या बैठकीत तोडगा नाही निघाला तर हे आंदोलन आणखी तीव्रपणे सुरू राहणार असल्याचे, केंद्रीय मार्ड अध्यक्ष डॉ. लोकेशकुमार चिरवटकर यांनी सांगितलं.

- Advertisement -
विद्यावेतनाच्या मुद्द्यावरुन निवासी डॉक्टरांचा राज्यव्यापी संप

जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्णपणे मान्य होत नाही तोपर्यंत हा निषेध असाच सुरू राहणार आहे. शुक्रवारी संघटनेची बैठक वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. शिनगारे यांच्याशी चर्चा होणार आहे. तसंच, विद्यावेतनाच्या मुद्द्यावर आश्र्वासन देण्यात आलं आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याशी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक होणार आहे. जे ४ मेडिकल कॉलेजचे निवासी डॉक्टर आहेत त्यांना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विद्यावेतन दिलं जाईल असं ही सांगण्यात आलं आहे.– डॉ. लोकेशकुमार चिरवटकर, अध्यक्ष, केंद्रीय मार्ड संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -