घरमुंबईमुलभूत सुविधा न दिल्यामुळे विकासकाच्या विरोधात रहिवाशी आक्रमक

मुलभूत सुविधा न दिल्यामुळे विकासकाच्या विरोधात रहिवाशी आक्रमक

Subscribe

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकांच्या बाजुला असणाऱ्या ग्रीन वर्ल्ड या इमारतीमध्ये प्राथमिक सुविधा बांधकाम व्यवसांयिकाने दिला नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला. शनिवारी रहिवाशांनी बांधकाम व्यवसांयिकाच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करत आक्रेश व्यक्त केला. दिघा रेल्वे स्थानकांच्या बाजुला अक्षर या बांधकाम व्यवसांयिकांकडून ग्रीन वर्ल्ड इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीमध्ये ८३२ फलॅट आहे. या इमारतीमध्ये १५० रहिवाशी राहण्यासाठी आले आहे. मात्र या इमारतीचा वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने रहिवाशी संतापले आहेत. या इमारतीला पालिकेकडून सीसी मिळाली आहे. मात्र अद्यापही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे बिल्डरकडून टँकरमार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नसल्यामुळे रहिवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

रहिवाशांना सुविधा नाही

इंटरनेट आणि केबलची सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुरक्षेच्या माध्यमातून इमारतीच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक नेमले आहे. मात्र सुरक्षेसाठी सीसीटीव्ही नसल्याने रहिवाशांनी सुरक्षा धोक्यात आली आहे. इमारतीमध्ये नवरात्रीच्या वेळी देवीची दानपेटी देखील चोरली गेली असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. सोसायटीमध्ये वाहने पार्क केल्यांनतर त्यामधील पेट्रोल चोरीला जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. सुरक्षेसाठी बांधकाम व्यवसांयिकांकडून सुरक्षा जाळी बसवून देण्यात येत नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेकडून ग्रीन वर्ल्ड या इमारतीला ओसी मिळण्यात आली आहे. त्यानंतर जलवाहिनी मिळण्यासाठी पालिका व एमआयडीसी दोन्ही प्राधिकरणाला पत्रव्यवहार करण्यात आला असून प्रशानाकडे पाठपुरावा सुरु आहे. येथील रहिवाशांनी मेटेन्सची रक्कम घेण्यात आली आहे. मात्र अद्यापपर्यंत या मेटेंन्स च्या खर्चाचा वापर करण्यात आला नसून स्व खर्चातून टॅकर ने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. इमारतीमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. इमरतीमध्ये जनरेटर बसवण्यात आले आहे. विधुत पूरवठा खंडित झाल्यानतर देखील उद्ववाहक सुरु राहते.
– निखिल ठक्कर, बांधकाम व्यवसायिक ग्रीन वल्र्ड इमारत

टॅकरच्या पाण्यामुळे अंघोळ केल्यामुळे अंगाला खाज येत असून केस गळत आहे. बांधकाम व्यवसांयिकाने संपुर्ण पैसे घेतल्यांनतर देखील प्राथमिक सुविधा मिळत नाही. पिण्याच्या पाणी विकत घेण्यासाठी महिन्याला १५०० रुपयांचा आर्थिक भुर्दुड सहन करावा लागत आहे. बांधकाम व्यवसांयिकाकडून सुरक्षेसाठी जाळी बसवून देण्यात येत नाही. विधुत पूरवठा वारंवार खंडित होत आहे.
– ज्योतिबा बोराटे, रहिवाशी

सन २०१२ ला बांधकाम व्यवसांयिकांकडे घर बुकिंग केले होते. मात्र २०१९ रोजी बांधकाम व्यवसांयिकांकडून पेझेशन देण्यात आले आहे. तर बांधकाम व्यवसांयिाकाकडून पेझेशन देण्यास उशीर झाल्यामुळे घरांचा हप्ता व घर भाडे असा आर्थिक भुर्दुड सहन करावा लागत आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची देखील सुविधा नसुन इंटरनेट, केबल यांची देखील सुविधा उपलब्ध नाही. सुरक्षेसाठी अद्यााप पर्यत सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाही.
-वीरसन कदम, रहिवाशी
Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -