घरमुंबईमुंबई विद्यापीठाच्या निकालाची श्वेतपत्रिका काढा

मुंबई विद्यापीठाच्या निकालाची श्वेतपत्रिका काढा

Subscribe

प्राध्यापकांच्या उन्हाळी सुट्टीबाबत कुलगुरू यांचे मौन,  ‘बुक्टु’ संघटना राज्यपालकडे करणार मागणी

मुंबई विद्यापीठ कायद्यानुसार ठरविलेल्या वेळेत निकाल का जाहीर करत नाही? त्याचप्रमाणे मुले एवढ्या मोठ्या प्रमाणात नापास का होतात? या सर्व प्रकारातले सत्य बाहेर यावे यासाठी मुंबई विद्यापीठाच्या निकालाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी राज्यपाल सी. विद्यासागर यांकडे करणार असल्याची माहिती प्राध्यापक संघटना बुक्टोच्यावतीने करण्यात येणार आहे. प्राध्यापकांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येदेखील पेपर तपासणीचे काम देण्यात येणार असून, प्राध्यापकांच्या सुट्ट्यांबाबत देण्यात आलेल्या आश्वासनावर अ‍ॅकेडमीक कौन्सिलच्या बैठकीत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी मौन बाळगल्यामुळे प्राध्यापकांमध्ये नाराजी आहे. पेडणेकर यांच्या भौंगळ कारभार विरोधात आता सरकारकडे दाद मागण्याचा निर्णय प्राध्यापक संघटना बुक्टोच्यावतीने घेण्यात आले आहे.

विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा झाल्यानंतर प्राध्यापकांना सुट्टी देण्यात येते. मात्र, मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे प्राध्यापकांना उन्हाळी सुट्टीमध्ये पेपर तपासणीच्या कामासाठी बोलाविण्यात आले आहे. प्राध्यापकांची उन्हाळी सुट्टी गेल्यामुळे बुक्टो संघटनेच्यावतीने निषेध आंदोलन केले होते. त्यानंतर कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी चर्चेला बोलावून प्राध्यपकांना त्याच्या सुट्ट्या मिळाव्या यासाठी महाविद्यालय उशिराने सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, शुक्रवारी झालेल्या अकॅडमीक कौन्सिलच्या बैठकीमध्ये कुलगुरू सुहास पेडणेकर आपल्या आश्वासनावर मागे फिरले. त्याचप्रमाणे प्राध्यापकांच्या सुट्टीबाबत एकही शब्द पेडणेकर म्हणाले नाही. त्यामुळे बैठकीनंतर प्राध्यापकांनी पेडणेकर यांच्या युटर्नबाबत नाराजी व्यक्त केली. आता प्राध्यापक संघटना आपल्या मागण्यांसाठी राज्य सरकारकडे दाद मागणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठ प्रत्येकवेळेला निकाल वेळत जाहीर करण्यात अपयशी का ठरते याचे उत्तर मागण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी राज्यपाल यांच्याकडे करणार असल्याचा बुक्टो संघटनेच्या सचिव मधु परांजपे म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -