विरोधकांनी त्या घटनेचे राजकीय भांडवल केले; संजय राऊतांच्या कानपिचक्या

Shiv Sena leader Sanjay Raut
शिवसेना खासदार संजय राऊत

निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच तापले असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी या घटनेवर भाष्य करणारे निवेदन सादर केले आहे. हे निवेदन त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. त्यामध्ये त्यांनी विरोधी पक्षाला धारेवर धरले असून भापज पक्षाने या घटनेचे भांडवल केल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच, पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री या घटनात्मक पदांबाबत टोकाची टीका करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार झाला तर लोकांच्या संयमाचा बांध फुटतो. म्हणून सगळ्यांनी जबाबदारीनं एकमेकांचा आदर ठेवून वागण्याची ही वेळ आहे. समाजात अशांतता व तणाव निर्माण होऊ न देणे हे सत्ताधाऱ्यांइतकेच विरोधकांचेही कर्तव्य आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

काय म्हटले आहे निवेदनात

महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्यांची गय केली जाणार नाही. हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. मुंबईत काल एका माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला झाला. त्या अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांबाबत प्रसारित केलेले छायाचित्र बदनामीकारक असले तरी त्यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त तितकीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. तरीही हल्लेखोरांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. विरोधी पक्षानं याचं राजकीय भांडवलं करणं दुर्देवी आहे. संयम दोन्ही बाजूंनी पाळला गेला पाहिजे.

हेही वाचा –

दिलासा! Oxford च्या कोरोना लशीच्या चाचण्यांवरील बंदी उठवली; भारतातही चाचण्या सुरू