घरमुंबईदादांनी खाल्ला लाडूसम्राटचा 'बटाटावडा'

दादांनी खाल्ला लाडूसम्राटचा ‘बटाटावडा’

Subscribe

महाराष्ट्राचे महसूल, सार्वजानिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी लालबाग येथील लाडूसम्राटचा 'बटाटावडा' आणि 'कोथिंबिर वडी'चा घेतला मनसोक्त आस्वाद

महाराष्ट्राचे महसूल, सार्वजानिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील आपल्या साध्य सरळ राहणीमानामुळे राज्यातील प्रत्येक जनतेला आपलेसे वाटतात. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दादांचे नवनवे पैलू त्यांच्या दौऱ्यावेळी अनुभवायला मिळतात. असाच अनुभव दादांच्या मुंबई दौऱ्यावेळी अनेकांना अनुभवायला मिळाला. आज सकाळी आपल्या नियोजित दौऱ्याला जाण्यासाठी दादा कल्याण येथून निघाले होते. त्यावेळी लालाबाग परिसरातून जात असताना त्यांना जुन्या दिवसांची आठवण झाली. त्यांनी लालबाग परिसराच्या भागातून जात दादांनी आपल्या वाहन चालकाला गाडी मुंबईच्या लाडूसम्राट येथे थांबवायला सांगितली, अन् वडापावचा आस्वाद घेण्यासाठी ते सरळ लाडूसम्राटच्या हॉटेलात गेले.

जेव्हा महसूल मंत्री लालबागमध्ये खातात बटाटावडा

राज्यातील इतक्या मोठ्या पदावरील व्यक्ती आपल्या हॉटेलमध्ये आल्याचे पाहून अनेकांचा एकच गोंधळ उडाला. दुकानाचे मालक राक्षे धावत-पळत येऊन दादांचे आदारतिथ्य करु लागले. त्यावेळी दादांनी त्यांना मध्येच अडवलं आणि सांगितलं की, तुम्ही जर माझ्याकडून पैसे घेणार असाल, तरच मी आपल्याकडे नाष्टा करणार अशी सूचना चंद्रकांत दादा पाटील यांनी हॉटेल मालकाला केली. यावेळी हॉटेलचे मालक राक्षे यांनीही होकार दर्शवला. त्यानंतर दादांनी आपल्या आवडीचा ‘वडापाव’ आणि ‘कोथिंबीर वडी’चा मनसोक्त आस्वाद घेतला. त्यानंतर हॉटेलचे मालक राक्षे यांच्याशी दादांनी चर्चा करत त्यांच्या जीवन प्रवासाविषयी जाणून घेतले. त्यावेळी अनेक जुन्या आठवणींना दादांनी देखील उजाळा दिला.

- Advertisement -

एका देव माणासाने दुकानाला दिली भेट

दादांच्या व्यक्तीमत्त्वातील हा पैलू पाहून हॉटेलमध्ये उपस्थित असणारे प्रत्येकजण भारावून गेले होते. राज्यातला एवढ्या मोठ्या मंत्रीपदावर कार्यरत असलेली व्यक्ती, जमिनीशी नाळ धरुन आहे, अशी चर्चा हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांमध्ये रंगली होती. तर एका देव माणासाने आज माझ्या दुकानाला भेट दिल्याची भावना हॉटेल मालक राक्षे यांनी व्यक्त केली.


वाचा – टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी साठवण्यासाठी टाक्या बसविणार – चंद्रकांत पाटील

- Advertisement -

वाचा – दुष्काळ निवारणासाठी देशातील सर्वाधिक मदत महाराष्ट्राला – चंद्रकांत पाटील


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -