पनवेल लोकसभा मतदारसंघात भाजपची आढावा बैठक

Mumbai
फोटो सौजन्य - विकीपीडीया

पनवेलमध्ये गुरुवारी भाजपने कोकणातील लोकसभा मतदारसंघात आढावा बैठक घेतली. या बैठकीत मावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. बैठकांमध्ये मोठ्या संख्येने आलेल्या इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असून संपूर्ण ताकतीनिशी भाजप पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे भाजपचे प्रदेश प्रभारी सरोज पांडे यांनी सांगितले.

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने संघटनात्मक बांधणी सुरू केली असून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिलेला २३ कलमी कार्यक्रमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. एकीकडे भाजप-सेना युतीची राजकीय चर्चा होत असताना भाजपने लोकसभेसाठी बैठक आयोजित केल्याने युतीबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. या प्रसंगी बूथ रचनेची माहिती घेण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कसोशीने प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना पांडे यांनी केल्या. या बैठकीला भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रभारी सरोज पांड्ये, प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे स्थानिक आमदार, स्थानिक पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते. तसेच मावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here