Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई रिया चक्रवर्ती मुंबईत शोधतेय दुसरे घर ?

रिया चक्रवर्ती मुंबईत शोधतेय दुसरे घर ?

Related Story

- Advertisement -

रिया चक्रवर्तीचे कुटुंबीय हे मुंबईतल्या खार परिसरात घर शोधताना दिसले आहेत. इंद्रजित आणि संध्या चक्रवर्ती हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून घराच्या शोधात फिरताना दिसले आहेत. रियाच्या कुटुंबीयांचा व्हिडिओ हा सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. रियाने याआधी इंस्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये तिने राहत्या सोसायटीमध्ये तिच्या कुटुंबीयांची प्रायव्हसी डिस्टर्ब होत असल्याचे नमुद केले होते. अनेक यंत्रणांच्या चौकशीला जात असतानाच प्रसार माध्यमांकडून होणाऱ्या त्रासाबाबत तिने इंस्टाग्राम पोस्ट केली होती.

एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात महिनाभर तुरुंगात काढल्यानंतर आता रियाला राहत्या ठिकाणच्या सोसायटीत नोटीस आली आहे. सांताक्रुझच्या सोसायटीने बाहेरचा रस्ता दाखवल्याने, तिला आता घर खाली करण्याची वेळ आले आहे. त्यामुळेच सांताक्रुझनंतर आता रियाने खार परिसरात घराचा शोध सुरू केला आहे. याआधीच सोसायटीने तिला घर खाली करण्यासाठी अल्टीमेटम दिला होता. रियाच्या सोसायटी समोर माध्यमांची असणारी वर्दळ पाहता तिला सोसायटीतून घर खाली करण्याचे बजावण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

- Advertisement -

काय म्हटले होते रियाने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये ?

सुशांत सिंह राजपुत प्रकरणात जेव्हा विविध सुरक्षा यंत्रणांकडून रियाची चौकशी सुरू होती, त्यावेळी तिच्या घरातून तिने एक व्हिडिओ शूट करून इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. त्या पोस्टमध्ये तिने उल्लेख केला होता की, हे सगळ माझ्या बिल्डिंगच्या खालच्या कंपाऊंडमध्ये घडते आहे. या व्हिडिओत दिसणारी व्यक्ती हे माझे वडील निवृत्त आर्मी ऑफिसर इंद्रजित चक्रवर्ती आहेत. आम्ही ईडी, सीबीआय आणि अनेक चौकशी करणाऱ्या सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत. पण सध्या माझ्या आणि कुटुंबीयांच्या जिवाला धोका असल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये नमुद केले होते. आम्ही याबाबतची माहिती ही स्थानिक पोलिसांनाही दिली आहे. पोलिस ठाण्यात जाऊनही आम्हाला कोणत्याच प्रकारची सुरक्षा देण्यात आलेली नाही. चौकशी करणाऱ्या यंत्रणांनाही याबाबतची माहिती दिल्यानंतरही आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत देण्यात आली नाही. आम्ही कस जगणार असा सवाल तिने या पोस्टमध्ये केला होता. आम्ही फक्त मदत मागतोय, ज्यामुळे आम्हाला अनेक यंत्रणांच्या चौकशीला सामोरे जाता येईल. म्हणूनच मी मुंबई पोलिसांना विनंती करते की आम्हाला सुरक्षा द्या, ज्यामुळे आम्ही सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करू शकू. माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी मी पोस्ट लिहित आहे असे तिने स्पष्ट केले आहे. कोरोना काळात तरी अशी मदत मिळावी अशी विनंती तिने या पोस्टमधून केली होती. तिने लिहिलेली ही इंस्टाग्राम अकाऊंटवरची शेवटची पोस्ट होती.

- Advertisement -

 


 

 

 

 

- Advertisement -