रियाच्या अटकेनंतर मुंबई आणि गोव्यात NCB ची ५ ठिकाणी रेड

रियाच्या अटकेनंतर सर्वात मोठी कारवाई

रिया चक्रवर्ती

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रियाला अटक करण्यात आली असून ड्रग्ज अँगलचा तपास मोठ्या वेगात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, NCB च्या पथकाने गोवा आणि मुंबईमध्ये ५ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. रियाच्या अटकेनंतर सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रिया आणि तिचा भाऊ शौविक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, NCB ने ही छापेमारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड कनेक्शन!

रियाच्या अटकेनंतर NCB ची सगळ्यात मोठी कारवाई असून छापेमारी झालेल्या ५ ठिकाणांचा ड्रग्ज सप्लाय करण्यासाठी वापर होत होता, अशी माहिती समोर येत आहे. यासह चौकशीमध्ये रियाने काही मोठ्या बॉलिवूड स्टार्सचीही नावं उघड केली आहेत मात्र त्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरी यातून मोठे रॅकेट समोर येणार असल्याचे दिसत आहे. ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड कनेक्शन असलेल्या ५ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. दरम्यान NCB पथकाच्या हाती नेमकी कोणती माहिती, पुरावे लागले आहेत, ते कळू शकलेले नाही.

अनेक बॉलिवूड स्टार्स हे NCB च्या रडारवर

रियाच्या चौकशीनंतर अनेक बॉलिवूड स्टार्स हे NCB च्या रडारवर आहेत. दरम्यान, या ड्रग्ज अँगलच्या तपासात नार्कोटिक्स विभागाला (NCB) मोठा साक्षीदार सापडला असून रिया चक्रवर्तीच्या घरी ड्रग्जचं कुरिअर पोहोचवणाऱ्या कुरिअर बॉयने या प्रकरणात अटकेत असलेल्या दीपेश सावंत आणि रियाचा भाऊ शौविकला त्याने ओळखलं आहे, अशी माहिती सध्या समोर येत आहे.

दरम्यान, सुशांतच्या घरून रियाच्या घरी कुरिअर पोहोचवणाऱ्या कुरिअर बॉयने दीपेश आणि शौविकला ओळखलं असून याशिवाय या कुरिअर बॉयचे फोन डिटेल्सही शौविक आणि दीपेशकडे सापडले आहेत.


रिया चक्रवर्तीने २०१२ मध्ये केलेले ‘हे’ tweet पुन्हा होतंय व्हायरल