घरमुंबईमुंबईकरांनो सावधान! डेंग्यू, मलेरिया पुन्हा पसरतोय

मुंबईकरांनो सावधान! डेंग्यू, मलेरिया पुन्हा पसरतोय

Subscribe

मुंबईतून पाऊस जरी गायब झाला असला तरी परतीच्या पावसाला लवकरच सुरूवात होणार आहे. त्यामुळे, आता पुन्हा एकदा साथीच्या आजारांचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. या दरम्यान डेंग्यू, हिवताप (मलेरिया), लेप्टोस्पायरोसिस आणि गॅस्ट्रो आदी आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे ही स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार, १५ ऑक्टोबर २०१८ पर्यंत मलेरिया रुग्णांची संख्या २०५ एवढी आहे. तर, सप्टेंबर महिन्यात एकूण ६२५ मलेरियाचे रुग्ण आढळले होते. या पंधरावड्यात मलेरियामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला. त्यासोबतच, डेंग्यूच्या रुग्णांतही वाढ झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑक्टोबरच्या पंधरावड्यात १८४ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. तर, सप्टेंबरमध्ये ही संख्या एकूण ३९८ वर पोहोचली होती. तसंच, सप्टेंबर महिन्यात तब्बल ५ जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. आतापर्यंत डेंग्यूमुळे १२ आणि मलेरियामुळे ३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १४ ते ६० वयोगटातील १३० पुरुषांना डेंग्यू या आजाराचं निदान झाले आहे. तर, याच वयोगटातील ५४ महिला डेंग्यूमुळे त्रस्त आहेत. २५ ते २९ या वयोगटात एकूण १०८ रुग्ण आढळले आहेत. ही संख्या सर्वाधिक आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या पंधरावड्यात एकूण २ हजार १७३ रुग्णांनी डेंग्यूसदृश आजार या कारणांनी वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेतले. तर, गेल्या वर्षी याच कालावधीत एकूण ३ हजार २९३ एवढे रुग्ण डेंग्यूसदृश आढळले होते. तर, सप्टेंबर या फक्त एका महिन्यात जवळपास ४ हजार ३६५ डेंग्यू संशयित रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर, गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात ३ हजार ७२१ रुग्ण आढळले होते.

- Advertisement -

मलेरियाने एकाचा मृत्यू

वाकोला पाईपलाईन परिसरात राहणाऱ्या ३९ वर्षीय पुरुषाला ८ ऑक्टोबर रोजा एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना ३ ते ४ दिवसांपासून थंडी ताप, अंगदुखी असा त्रास होत होता. या रुग्णाला तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसनदेखील होते. शिवाय ते मानसिक तणावाखाली असल्याचेही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर, त्यांना मोठ्या प्रमाणात अशक्तपणा आणि मलेरियाची लागण झाल्याचा रिपोर्ट देण्यात आला आहे. या व्यक्तीला त्याच दिवशी डॉक्टरांनी मृत घोषित केले. वाकोला भागात मलेरियाचा रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेकडून ६६९ घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं. १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीच्या माहितीनुसार सर्वच साथीच्या आजारांची माहिती देण्यात आली. यावर्षी ऑक्टोबरपर्यंत १३ जणांचा एच१एन१ ने मृत्यू झाला असून मागच्या वर्षी हीच आकडेवारी १८ एवढी होती.

गॅस्ट्रोच्या रुग्णांतही वाढ 

१ ते १५ ऑक्टोबर दरम्यान गॅस्ट्रोच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. या पंधरावड्यात २५७ गॅस्ट्रोचे रुग्ण आढळले आहेत. तर, गेल्या वर्षी याच कालावधीत ५४६ गॅस्ट्रोचे रुग्ण आढळले होते. तसंच सप्टेंबर महिन्यात ४४५ गॅस्ट्रोचे रुग्ण आढळले होते. त्यामुळे लोकांनी रस्त्यावरील तेलकट, तूपकट पदार्थ खाणं टाळले पाहिजे असा सल्ला डॉक्टर देतात.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -