मुंब्यात रस्त्यावर मृत्यूचा धोका

उघड्या वीज केबल्समुळे एक जण भाजला

Mumbai

मुंब्रा परिसरात उघड्या वीज डिपी आणि विद्युत केबल्समुळे परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. गुरुवारी सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर उघड्या केबल्सचा झटका लागून एक नागरिक भाजल्याची घटना घडली. जखमीवर खाजगी रुग्णालयात उचार करून त्यांना रात्री घरी सोडण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उघड्या केबल्सची व्यवस्था करा अन्यथा मोठी दुर्घटना घडेल, अशा आशयाच्या वारंवार तक्रारी केल्यानंतरही विद्युत वितरणाच्यावतीने कुठलीच हालचाल आणि दक्षता घेण्यात आली नाही. गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास धर्मेंद्र चौधरी (39 रा. सलीम मेन्शन, शरीफ रोड, मुंब्रा) हे दुकानदार दुकानावर जाण्यासाठी निघाले. यांचा मसाला विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा पाय उघड्या केबल्सवर पडला आणि त्यांच्या पँटने पेट घेतला आणि त्यांचा पाय भाजला. तसेच भुवया आणि हातापायालाही दुखापत झाली. त्यांना तत्काळ खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार केल्यानंतर रात्री घरी सोडण्यात आले आहे.

या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. मुंब्रा परिसरात उघड्या डिपी आणि हायटेंशन विद्युत केबल्स धोकादायक अवस्थेत पडलेल्या आहेत. यापूर्वीच दोन महिलाही अशा प्रकारेच वीज केबलमुळे भाजल्याची घटना घडली होती. मात्र, अशा तक्रारीनंतरही विद्युत महावितरण कुठलीच कार्यवाही करीत नसल्याने मुंब्रावासी मृत्यूच्या दाढेत वावरत आहेत अशी परिस्थिती आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here