रितेश-जेनेलिया राजकारणात? ‘या’ व्यक्तीची घेणार मुलाखत!

Mumbai

बॉलिवूडमधील प्रेक्षकांचं लाडकं कपल अर्थात म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया. या दोघांच्या जोडीचे दाखले अनेकवेळा दिले जातात. रितेश आपल्या भावांप्रमाणे राजकारणात सक्रीय नसला तरी तो निवडणूकीदरम्यान सक्रीय सहभाग घेतो. लवकरच तो रजाकारण सहभागी होत नसला तरी एका राजकीय व्यक्तीची मुलाखत घेणार आहे. ही व्यक्ती म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांची पत्नी अमिता चव्हाण. या दोघांची प्रकट मुलाखत रितेश आणि जेनेलिया घेणार आहेत. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने नांदेडमध्ये आयोजित ‘आनंदाचे डोही’ कार्यक्रमात ही मेगामुलाखत रंगणार आहे.

१४ फेब्रुवारीला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यांची पत्नी अमिता चव्हाण यांची विशेष मुलाखत घेतली जाणार आहे. महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी समारोह समितीच्या वतीने हा कार्यक्रम शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडेल. दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण कौटुंबिक आयुष्यात कसे होते? मुलांना आणि नातवंडांना त्यांनी काय शिकवण दिली, कोणते संस्कार दिले अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या मुलाखतीत मिळणार आहेत.

सध्या सगळ्यांचं लक्ष या मुलाखतीकडे आहे. एकतर अनेक प्रश्नांची उत्तर या मुलाखतीतून मिळतीलच. पण ही मुलाखत रितेश आणि जेनेलिया घेणार म्हटल्यावर रितेश-जेनेलियाचे चाहतेही खूष आहेत.