घरमुंबईमंत्रालयासमोर रोड ब्लॉक नाकारला

मंत्रालयासमोर रोड ब्लॉक नाकारला

Subscribe

भुयाराचे काम आता एनएटीएम तंत्रज्ञानाने

मंत्रालय ते विधानभवन दरम्यानच्या भुयारी मार्गासाठी मंत्रालयासमोरील रस्त्यावर रोड ब्लॉक घेण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. महत्वाच्या अशा रस्त्यावरची वाहतूक थांबवता येणार नसल्याची सबब देत आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हे काम सुरू करण्यात आले आहे. न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड हे तंत्रज्ञान वापरून हे काम येत्या दिवसात करण्यात येणार आहे.

मंत्रालयाच्या सध्याच्या प्रवेश द्वाराच्या सुरक्षा कक्षाच्या मागील बाजूला सध्या कट एण्ड कव्हर या पद्धतीचा वापर करून कामाला सुरूवात झाली आहे. दोन ठिकाणी कट एण्ड कव्हर पद्धत वापरून भुयार तयार करण्यात येणार आहे. कट एण्ड कव्हरसाठी दुसरे ठिकाणी विधानभवन येथे आहे. दोन्ही दिशेने हे काम करण्यात येणार आहे. भूयार खणण्यासाठी छोट्या क्षमतेचे ब्लास्ट करण्यात येणार आहेत. मंत्रालयात कामानिमित्ताने ये जा करणार्‍या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या सोयीसाठी हे भूयार तयार करण्यात येत आहे. जमीनीखाली १५ मीटर या भुयाराचे काम सुरू आहे. त्यामुळे वरच्या बाजुला रस्ते वाहतूक सुरू राहिली तरीही भूमीगत काम करण्यात येणार आहे.

- Advertisement -

न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथडच्या माध्यमातून भुयारातील रस्ता एकमेकांशी जोडण्यासाठीची ही पद्धत आहे. मंत्रालयासमोरील रोड ब्लॉकसाठी झालेला मज्जाव पाहता ही पद्धत टनेलिंगसाठी वापरण्यात येणार आहे. या कामासाठी काही महिन्यांपूर्वी सॉईल टेस्टिंगचे कामही करण्यात आले होते. या संपुर्ण कामाचे कंत्राट लार्सन एण्ड टुब्रो तसेच एसटीईके ला देण्यात आले आहे. आगामी वर्षभरात हे काम पुर्ण होणे अपेक्षित आहे. हे भुयार मेट्रो ३ च्या विधानभवन स्टेशनशी जोडले जाणारे असे आहे. भुयाराच्या कामाचे एमएमआरसीचे कौशल्य असल्यानेच हे काम पीडब्ल्यूडीने त्यांच्याकडे सोपावले आहे. या संपुर्ण कामासाठी अर्थसंकल्पाअंतर्गत ४०० कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. तसेच राज्याच्या कॅबिनेटनेही या कामासाठीची मंजुरीही काही महिन्यांपूर्वी दिली आहे.

मंत्रालय ते विधानभवन असा भुयारी मार्ग तयार करण्चाच्या कामासाठीचा करार सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) दरम्यान गेल्या महिन्याअखेरीस झाला आहे. या कामासाठी येणारा निधी पीडब्ल्यूडी विभागाकडून काही टप्प्यात देण्यात येणार आहे. पण भुयारी मार्गाच्या डिझाईनमध्ये रोड ब्लॉक नाकारल्यामुळे कोणतेही बदल झाले नाहीत अशी माहिती एमएमआरसीच्या प्रवक्त्याने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -