Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'महाराष्ट्रद्रोही भाजपाचा खरा मुखवटा आला समोर'

‘महाराष्ट्रद्रोही भाजपाचा खरा मुखवटा आला समोर’

भाजपला खूश करण्यासाठीच महाराष्ट्राची बदनामी केल्याची कबुली देऊन महाराष्ट्रद्रोही भाजपाचा खरा मुखवटा आता समोर आला आहे.

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या वादग्रस्त विधानांवरून चर्चेत असते. नवीन वर्षांतही ती काही शांत बसलेली नाही. तिने शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांच्यावर केलेल्या एका विधानावरुन भाजपचा खरा चेहरा समोर आणला आहे. यावरुन राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी कंगनाचे ट्विटरवरुन अभिनंदन केले आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

‘भाजपला खूश करण्यासाठीच महाराष्ट्राची बदनामी केल्याची कबुली देऊन महाराष्ट्रद्रोही भाजपाचा खरा मुखवटा आता समोर आला आहे. हा खरा चेहरा समोर आणणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतचं अभिनंदन करायला पाहिजे. आता या द्रोहाबद्दल भाजपाला काय शिक्षा द्यायची ते आता राज्याची स्वाभिमानी जनताच ठरवेल’, असा घणाघात राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

- Advertisement -

काय होते कंगनाचे विधान?

‘मी भाजपाला पाठिंबा देऊन मला त्याचा काहीच फायदा झाला नाही. पण, उर्मिलाला काँग्रेसमुळे खूप फायदा झाला आहे. मी माझ्या मेहनतीने घर विकत घेतले होते. पण, काँग्रेस ते घर तोडत आहे’, असे ट्विट करून कंगनाने उर्मिलावर चांगलाच निशाणा साधला आहे. पुढे ती म्हणाली की, ‘भाजपाला खूश करून माझ्या हातात फक्त २५ ते ३० कोर्ट केस आल्या आहेत. मी ही तुमच्यासारखी समजूतदार असती तर काँग्रेसला खूश ठेवू शकली असती. मी किती मुर्ख होते ना?’, असे कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे. कंगनाचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. तिचे चाहतेही तिच्या या ट्विटची मजा घेताना दिसत आहेत.

- Advertisement -

काय म्हणाली उर्मिला?

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेसपक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश घेताच उर्मिलाने नवीन ऑफिस खरेदी केले आहे. या ऑफिससाठी उर्मिलाने तब्बल तीन करोड रूपये खर्च केले आहेत. उर्मिलाच्या या नव्या ऑफिसच्या मुद्द्यावरून कंगानाने चांगलाच निशाणा साधला. कंगनाच्या या ट्विटवर उर्मिलाने तोडीस तोड असे तिच्या शैलीत उत्तर दिले आहे. ‘प्रिय कंगनाजी, माझ्या बद्दलचे तुमचे विचार मी एकले, मीच नाही तर संपूर्ण देशाने ऐकले आहे. संपूर्ण देशासमोर सांगते की, जागा आणि वेळ तुम्ही ठरवा. सर्व कागदपत्र घेऊन मी येते. २०११मध्ये स्वत:च्या मेहनतीवर अंधेरीत फ्लॅट विकत घेतल्याचा त्यात पुरावा मिळेल’, असे उर्मिलाने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.


हेही वाचा – भाजपाला खुश करून माझ्या हातात फक्त २५ ते ३० कोर्ट केस आल्या – कंगना


 

- Advertisement -