फ्लॅटच्या नावाने साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक

Mumbai
one man got cheated for 35 lakhs on bait flat

फ्लॅटच्या नावाने साडेपाच कोटी रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या चार तोतया संचालकाविरुद्ध आरएके मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या चारही आरोपींविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणूक करणे तसेच मोफा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पळून गेलेल्या चौघांचा आता पोलीस शोध घेत आहेत.

खुशपत सुकनराज जैन हे मरिनड्राईव्ह येथील धोबीतलाव परिसरात राहतात. पाच वर्षांपूर्वी त्यांची चारही आरोपींशी ओळख झाली होती. या चौघांनी ते मेसर्च तायली रिअलिटी एल. एस. पी कंपनीचे संचालक असल्याचे सांगितले. त्यांच्या कंपनीतर्फे रुपारेल अरियाना या बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीमध्ये फ्लॅट बुक केल्यास कमी दरात त्यांना फ्लॅट दिले जाईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर खुशपत जैन हे त्यांच्या दादर येथील नायगाव, जेराबाई वाडिया रोडवरील रुपा रेह अरियाना या कंपनीच्या कार्यालयात गेले होते. तिथे त्यांनी एक फ्लॅट बुक केला आणि फ्लॅटसाठी टोकन रक्कम दिली होती. त्यांच्यासह इतर काही लोकांनी या इमारतीमध्ये फ्लॅट केले होते.

या सर्वांनी फ्लॅटसाठी 5 कोटी 44 लाख 53 हजार रुपये दिले होते. ही रक्कम मिळाल्यानंतर संबंधित सर्वांना कंपनीच्यावतीने बोगस अलॉटमेंट लेटर देण्यात आले होते. मात्र या चौघांकडे रुपारेल रिअ‍ॅलिटी कंपनीच्या भागीदार असल्याचे कुठलेही अधिकार नव्हते. त्यामुळे त्यांनी फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा परस्पर अपहार करुन फसवणुक केली होती. पाच वर्ष उलटूनही कंपनीने रुपारेल अरियाना इमारतीमध्ये कोणालाही फ्लॅट दिला नाही किंवा फ्लॅटचे कागदपत्रेही दिली नाही. याबाबत कंपनीत विचारला केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर खुशपत जैन यांच्यासह इतर साक्षीदारांनी आरएके मार्ग पोलिसांत संबंधित चारही तोतया संचालकाविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झालेली नसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here