घरमुंबईजे. जे हॉस्पिटलमधील ८३ पैकी १५ व्हेंटिलेटर्स बंद

जे. जे हॉस्पिटलमधील ८३ पैकी १५ व्हेंटिलेटर्स बंद

Subscribe

मुंबईतील जे.जे या सरकारी हॉस्पिटलमध्ये १८ टक्के व्हेंटिलेटर्स निकामी असल्याची धक्कादायक माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे.

मुंबईतील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या जे.जे या सरकारी हॉस्पिटलमध्ये १८ टक्के व्हेंटिलेटर्स निकामी असल्याची धक्कादायक माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. ८३ पैकी १५ व्हेंटिलेटर्स बंद असल्याचं या माहिती अधिकारातून स्पष्ट झालं आहे. सरकारी हॉस्पिटलपैकी सर्वात नावाजलेलं हॉस्पिटल म्हणून जे.जे हॉस्पिटलची ओळख आहे. पण, सध्या या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या व्हेंटीलेटर्सची अवस्था बिकट झाली आहे.

अतिदक्षता विभागात निकामी व्हेंटिलेटर्स

फक्त मुंबईतूनच नाही तर अख्या महाराष्ट्रातून जे.जे हॉस्पिटलमध्ये रुग्ण उपचारांसाठी येतात. त्यामुळे, शस्त्रक्रिया किंवा आपातकालीन परिस्थितीत प्रत्येक रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज भासते. पण, माहिती अधिकाराला मिळालेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलमधील एकूण व्हेंटिलेटर्सपैकी डझनभर व्हेंटिलेटर्स दुरुस्तीसाठी देण्यात आले आहेत. व्हेंटिलेटर्सचे काही सुटे भाग हरवल्याचंही हॉस्पिटलने सांगितलं आहे. एका जपानी कंपनीने २००४ मध्ये काही व्हेंटिलेटर्स जेजे हॉस्पिटलला दिले होते. यामधीलही काही व्हेंटिलेटर्स निकामी झाले आहेत. विशेष म्हणजे निकामी व्हेंटिलेटर्सपैकी ४ व्हेंटिलेटर्स आयसीयूमधील आहेत. तर, २७ पैकी ६ व्हेंटिलेटर्स अतिदक्षता विभागातील आहेत. काही निकामी व्हेंटिलेटर्स वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहेत.

- Advertisement -

आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी दिलेल्या माहिती अधिकारातून ही बाब स्पष्ट झाली आहे. मुंबईसारख्या शहरातील अनेक हॉस्पिटलमधील अंसख्य व्हेंटिलेटर निकामी आहेत, असे आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी म्हटले आहे. कोठारी यांनी मुंबईतील महापालिकेच्या हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर्सची स्थिती काय आहे? शहरातील हॉस्पिटलमध्ये पुरेसे आयसीयू बेड आहेत का? ते चांगल्या स्थितीत आहेत का? हे जाणून घेण्यासाठीच ही माहिती मागवली होती. याबाबतची सुनावणी राज्य मानवी हक्क आयोगापुढे सुरू आहे.


वाचा – महापालिका रुग्णालयांसाठी ७६ व्हेंटिलेटरची खरेदी

- Advertisement -

वाचा – जे. जे रुग्णालयात रुग्णांना मिळणार हवाई सेवा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -