घरमुंबईअनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याची अफवा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याची अफवा

Subscribe

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याच्या जोरदार चर्चा रंगत होत्या. मात्र साखरपुड्याचे हे वृत्त अंबानी कुटुंबियांनी फेटाळून लावलं आहे. अनंत आणि राधिका यांच्या साखरपुड्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये अनंतने पांढरा कुर्ता आणि निळे जॅकेट घातले होते. तर राधिकाने पार्टीवेअर ड्रेस घातला आहे. या फोटवरुन त्यांच्या साखरपुड्याच्या जोरदार चर्चा सुरु आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात यावर्षी दोन लग्न होणार आहेत. मुलगी ईशाचे लग्न पिरामल ग्रुपचे अध्यक्ष अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्यासोबत होणार आहे. तर त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यांचे लग्न श्लोका मेहता हिच्याशी होणार आहे. गेल्या आठवड्यातच ईशा आणि आनंद पिरामल यांचा साखरपुडा झाला. तर दोन महिन्यांपूर्वी आकाश आणि श्लोका मेहता यांचा साखरपुडा झाला होता. या दोघांच्या साखरपुड्यानंतर आता अंबानी कुटुंबियात तिसरा साखरपुडा होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या. अंबानींचा धाकटा मुलगा अनंत आणि राधिका यांच्या साखरपुड्याची चर्चा होती. मात्र या वृत्ताला अंबानी यांनी फेटाळून लावले.

- Advertisement -

२४ वर्षीय राधिका मर्चंटने न्यूयॉर्क विद्यापीठातून राज्यशास्त्राची पदवी घेतली आहे. तसंच राधिकाने तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमध्येच पूर्ण केले आहे. अनंत आणि राधिका यांची मैत्री खूप जुनी असून, अंबानी कुटुंबियदेखील राधिकाला गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतात. अंबानी कुटुंबियांनी ईशाच्या साखरपुड्यानिमित्ताने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये राधिका श्लोका आणि ईशा अंबानी यांच्यासोबत नाचताना दिसली. या पार्टीमध्ये राधिकांने निळ्या रंगाचा लेंहगा घातला होता. त्याचसोबत अंबानी कुटुंबिय सिध्दिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेले असता त्यांच्यासोबत राधिका मर्चंट ही सु्द्धा उपस्थित होती.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -