मुंबईत ‘या’ तारखेला सुरु होणार संपूर्ण कार्यालयं, लोकल, शाळा? – TIFR

मुंबईत सप्टेंबर महिन्यात कार्यालयांमध्ये उपस्थिती आणि परिवहन यंत्रणेची क्षमता या दृष्टीने शहर ३० टक्क्यांनी सुरु केली जाऊ शकते.

प्रातिनिधीक फोटो

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा मिशन बिगेन अगेन अंतर्गत प्रशासनाने नियम अटी लागू करून लॉकडाऊनचे नियम शिथील केले आहेत. असे असले तरी राज्यात पुर्णतः सर्व कार्यालये किंवा शाळा, महाविद्यालये अद्याप सुरू झालेले नाही. तसेच ठराविक कर्मचारी वगळता सामान्य प्रवाशांना रेल्वेच्या प्रवासास कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. अशापरिस्थित मुंबईत शाळा आणि कार्यालयं कधीपासून पूर्ण सुरु होणार याकडे सर्वच नागरिकांचे लक्ष आहे.

शास्त्रीय मॉडेल बनवून मुंबई महापालिकेकडे सादर

दरम्यान टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने (TIFR) मुंबई महापालिकेला असे सुचवले आहे की, १ नोव्हेंबरपासून ऑफिसेस, लोकल आणि १ जानेवारी २०२१ पासून शाळा सुरु करु शकतात. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने शास्त्रीय मॉडेलवर आधारित ही तारिख असल्याचे सांगितले जात आहे. हा अंदाज व्यक्त करत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने कोविड -१९  साथीचा रोग या विषयावर गणितीय पद्धतीनं शास्त्रीय मॉडेल बनवून मुंबई महापालिकेला सादर केला आहे.

१ नोव्हेंबरपर्यंत शहरं पूर्ण कार्यान्वित होणार?

मुंबईत सप्टेंबर महिन्यात कार्यालयांमध्ये उपस्थिती आणि परिवहन यंत्रणेची क्षमता या दृष्टीने शहर ३० टक्क्यांनी सुरु केली जाऊ शकते. ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढवता येऊ शकते. शहर आणखी हळूहळू खुले केले पाहिजे आणि १ नोव्हेंबरच्या सुमारास पूर्ण कार्यान्वित व्हावे, असे टीआयएफआरच्या टीमने म्हटले आहे.

जानेवारी २०२१ मध्ये शाळा होणार सुरू!

गणितीय पद्धतीने केलेल्या अभ्यासाच्या आधारे १ नोव्हेंबर ही मुंबईची कार्यालये आणि वाहतुकीचं नेटवर्क पूर्णपणे उघडण्यासाठी ही शास्त्रीय तारीख आहे. तर स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अँड कॉम्प्यूटर सायन्सने सादर केलेल्या अहवालानुसार, जानेवारी २०२१ मध्ये शाळा पुन्हा सुरू होऊ शकतात.

हार्ड इम्युनिटीबाबत अहवालात म्हटलं आहे की, सार्वजनिक वाहतुकीमध्ये सामाजिक अंतराचे निकष पाळले पाहिजेत आणि मास्कचा अनिवार्य वापर, हातांची स्वच्छता आणि गाड्या व कामाच्या ठिकाणी नियमित निर्जंतुकीकरण यासारख्या स्वच्छतेच्या उपायांचे पालन केले पाहिजे, असेही अहवालात म्हटले आहे.


CoronaVirus: बाधितांच्या आकड्यांत आतापर्यंतची सर्वात मोठी नोंद; २४ तासांत ९०,६३३ नवे रुग्ण