घरमुंबई'युनेस्को एशिया पॅसिफिक' पुरस्काराने 'रतनसी मुलजी जेठा फाऊंटन' चा गौरव

‘युनेस्को एशिया पॅसिफिक’ पुरस्काराने ‘रतनसी मुलजी जेठा फाऊंटन’ चा गौरव

Subscribe

सुस्थितीत केलेल्या रतनसी मुलजी जेठा फाऊंटनला युनेस्कोने एशिया पॅसिफिक पुरस्काराने गौरव केला

दक्षिण मुंबईतील मुख्य टपाल कार्यालयासमोरील (GPO) ‘मिंट’ मार्गावर असणाऱ्या ‘रतनसी मुलजी जेठा फाऊंटन’ला ‘युनेस्को एशिया पॅसिफिक’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या प्रकल्पाची नोंद संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘युनेस्को’ या जागतिक वारसा यादीत करण्यात आली आहे. सन १८९४ मध्ये बांधण्यात आलेले हे कारंजे मुंबई महानगरपालिकेने ‘सार्वजनिक खाजगी भागीदारी’च्या माध्यमातून (Public Private Partnership) आणि ‘काळा घोडा असोसिएशन’च्या सहकार्याने पुन्हा सुस्थितीत केले आहे. या ‘फाऊंटन रिस्टोरेशन’ प्रकल्पाची विशेष नोंद ‘युनेस्को’ने केली आहे.

नुकतेच जारी करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या ‘एशिया पॅसिफिक’ पुरस्काराने या कारंज्याचा सन्मान करण्यात आला, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त (सुधार) चंद्रशेखर चोरे यांनी दिली आहे.

- Advertisement -

महापालिका क्षेत्रातील ‘ए’ विभाग कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात हे फाऊंटन आहे. सन १८९४ मध्ये ‘इंडो-सेरेसेनिक’ या स्थापत्य शैलीमध्ये हे फाऊंटन बांधण्यात आले होते. हे कारंजे मुंबई महापालिकेच्या वारसा जतन यादीमध्ये ‘दर्जा – १’ वर आहे. सुमारे सव्वाशे वर्षे जुन्या असणाऱ्या या फाऊंटनला पुन्हा एकदा सुस्थितीत आणण्याची गरज गेल्या काही वर्षांपासून होती. ‘काळाघोडा असोसिएशन’ च्या सहकार्याने वारसा जतन या विषयात कार्य करणारे ‘वास्तु विशारद’ (Conservation Architect) विकास दिलावरी यांच्या मार्गदर्शनात हे कार्य पूर्ण करण्यात आले. सदर फाऊंटन पुन्हा सुस्थितीत आणण्याचा हा प्रकल्प जानेवारी २०१८ मध्ये पूर्ण झाला. २०१५ ते जानेवारी २०१८ या कालावधीदरम्यान हा प्रकल्प यशस्वीरितया पूर्ण करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -