घरक्रीडाVideo: सचिन तेंडुलकरने कुटुंबियांसाठी बनवली मँगो कुल्फी; पहा रेसिपी!

Video: सचिन तेंडुलकरने कुटुंबियांसाठी बनवली मँगो कुल्फी; पहा रेसिपी!

Subscribe

सध्या लॉकडाऊनच्या काळात वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, सणवार, गेट टुगेदर असे सर्वच कार्यक्रम घरच्या घरी होत आहेत. बहुतांश लोकं घरीच खास क्षणांना आवडत्या पदार्थांची रेसिपी बनवून आपल्या कुटुंबियांना आनंदी ठेवत आहेत. असाच सुंदर प्रयत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही केला आहे. आज सचिन आणि अंजली यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस असून या निमित्ताने सचिनने कुटुंबियांसाठी खास मँगो कुल्फीचा बेत आखला आहे. सचिनने स्वतः मँगो कुल्फी बनवली असून ही रेसिपी त्याने चाहत्यांसोबतही शेअर केली आहे. यावेळी सचिनची आईदेखील त्याच्या मदतीसाठी किचनमध्ये उपस्थित असून ती आज त्यांना बटाट्याच्या भरीताची रेसिपी शिकवणार असल्याचे गमतीने सांगत आहे. अशा खेळीमेळीच्या वातावरणात सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबियांचे तोंड गोड करण्यासाठी स्वतः शेफ बनला आहे.

A Surprise for our 25th Wedding Anniversary

Made this Mango Kulfi as a surprise for everyone at home on our 25th wedding anniversary. ? ☺️

Sachin Tendulkar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಮೇ 25, 2020

- Advertisement -

सचिन बनला हेअर स्टायलिश 

यापूर्वीही सचिनने हातात कात्री घेऊन घरातच हेअर कटिंगचा प्रयोग करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. लॉकडाऊनमुळे सर्व सलून, पार्लर बंद आहेत. अशात भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर हेअर स्टायलिस्ट बनला होता. आपला मुलगा अर्जुनचे केस कापतानाचा एक व्हिडीओ सचिनने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सचिन तेंडुलकर आधीपासूनच सक्रीय आहे. त्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यापासून ते अनेक संस्थांच्या स्वच्छताविषक उपक्रमात सचिन सहभागी झाला आहे. तसेच सुरुवातीपासूनच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे देखील सचिन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

हेही वाचा –

रेल्वे आरक्षण तिकिटांचा परतावा सहा टप्प्यात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -