घरमुंबईसर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, सलूनच्या दरात २० ते ४० टक्के दरवाढ निश्चित!

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, सलूनच्या दरात २० ते ४० टक्के दरवाढ निश्चित!

Subscribe

सलून सुरु होण्यापूर्वीच दरात 20 ते 40 टक्के दरवाढ निश्चित

लॉकडाऊनच्या नियमांमधून शिथिलता मिळण्यापूर्वीच सलून व्यावसायिकांनी दरवाढ केल्याचे सांगण्यात येत आहे. तर लॉकडाऊननंतर सलून, ब्युटी पार्लरला शिथिलता मिळाल्यास खबरदारीचे उपाय अधिकाधिक करावे लागणार असल्याने ही दरवाढ करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे सलून व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. मात्र सलून व्यावसायिकांच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे.

२० ते ४० टक्के दरवाढ निश्चित

दरम्यान, खबरदारीचे उपाय करुन सलून सुरु करण्याची तयारी व्यवसायिकांनी दाखवल्यानंतर खबरदारी घेताना ज्या उपाययोजना करायच्या आहेत, त्यासाठी सर्व गोष्टींचा पुर्णपणे विचार करुन, सलून सुरु होण्यापूर्वीच या दरात २० ते ४० टक्के दरवाढ निश्चित करण्यात आली आहे.

- Advertisement -

                 आधीचे दर             आताचे दर

  • हेअर कटिंग    ८० ते १०० रुपये      १५० ते १७० रुपये
  • शेविंग           ४० ते ५० रुपये        ८० ते १०० रुपये
  • फेशियल       ५०० ते ७०० रुपये    ८०० ते १००० रुपये
  • हेअर कलर    ३५० ते ५०० रुपये    ६०० ते ७०० रुपये

गर्दी होऊ नये म्हणून अपॉईंटमेंट

सलून सुरु झाल्यास गर्दी होऊ नये यासाठी अपॉईंटमेंट घ्यावी लागणार आहे. त्यामुळे या सगळ्याचा विचार करुन सलून सुरु होण्यापूर्वी नियमावली आणि वाढीव दर ठरवल्याने आता फक्त सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी हे सलून व्यावसायिक करत आहेत.

सलूनमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी खुर्च्या कमी करुन खुर्च्यांमध्ये अंतर ठेवणे, मास्क सॅनिटायजरचा वापर करणे, पीपीई किटचा वापर करणे, अशा प्रकारचा खर्च वाढणार आहे. तर काही ठिकाणी काम करणारे लोक सुद्धा कमी करावे लागणार आहेत. त्यामुळेच ही दरवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सलून व्यवसायिकांकडून सांगण्यात येत आहे.


सोशल डिस्टन्सिंग नसल्याने कर्मचाऱ्यांनीच रोखून धरली शटल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -