Monday, August 10, 2020
Mumbai
28 C
घर महामुंबई आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत डोंबिवलीच्या शिरपेचात नवा तुरा !

आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत डोंबिवलीच्या शिरपेचात नवा तुरा !

जगभरातील सैन्याच्या शौर्याला नृत्यातून सलाम

Mumbai

कलानगरी म्हणूनच डोंबिवलीची ओळख आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून कलाकारांनी डोंबिवलीचे नाव सातासमुद्रापार नेले आहे. त्यातच आता आणखी एक भर पडली आहे. थायलंड येथे झालेल्या आंतराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत डोंबिवलीच्या पेसमकर डान्स अकॅडमीने मानाची ट्रॉफी पटकावून डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. जगभरातील सैन्याच्या शौर्याला नृत्याच्या माध्यमातून सलाम करत या पेसमेकर संघाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

थायलंड येथे 2 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धा झाली. या स्पर्धेसाठी जगभरातून चारशेहून अधिक कलाकार सहभागी झाले होते. यात डोंबिवलीच्या पेसमकर डान्स अकॅडमीच्या स्पर्धकांनी ग्रॅन्ड फिनालेमध्ये मानाची गोल्ड ट्रॉफी पटकावली. हीप हॉप आणि बॉलिवूड डान्स या प्रकारातून त्यांनी जगभरातील सैन्याच्या शौर्याला मानवंदना दिली. या फ्री स्टाईल नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. या विजेत्या संघाला पेसकमेकर डान्स अकॅडमीचे योगेश पाटकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांना शुभम तांबे आणि सागर चव्हाण यांनी सहाय्य केले.

या विजेत्या संघामध्ये मिहीर चौधरी, अखिलेश वारीक, मिली शहा, पूजा हडकर, सानिका सावडेकर, चैताली चौधरी, दिशा चौधरी, ईशा भगत, अवनी पवार, टीना पंजवानी,सहाना मैत्रा, देविकृष्ण जयशंकर,लतिका राजगणेश, रष्मिता चित्रे, हर्षिता पंजवानी, तनया अचरेकर, सागर चव्हाण यांचा समावेश होता. थायलंड येथे झालेल्या स्पर्धेत विजेत्या संघाला तेजस आणि महेश पुजारी या दोघांनीही विशेष मार्गदर्शन केले. डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण, विनोद पाटील, महेश पटेल, प्रल्हाद म्हात्रे, भाई पानवडीकर आदींनी या संघाला स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य केले. विजेत्या संघाचे डोंबिवलीकरांकडून कौतुक होत आहे.