घरताज्या घडामोडीमोदींनी मनात आणले तर अशक्य तेही शक्य - शिवसेना!

मोदींनी मनात आणले तर अशक्य तेही शक्य – शिवसेना!

Subscribe

शिवसेना आणि भाजप यांच्यातले संबंध गेल्या वर्षी निवडणुकांनंतर युती तुटल्यापासून आजपर्यंत कमालीचे ताणले गेले आहेत. मात्र, तरीदेखील अनेकदा या दोन्ही पक्षांमध्ये सामोपचार होण्याचं चित्र निर्माण होत. नुकतीच खासदार संजय राऊत यांनी घेतलेली देवेंद्र फडणवीस यांची ‘गुप्त’ भेट देखील याचाच एक भाग मानली गेली. त्यावरून राजकीय तर्क लावले गेले. आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं गेलं आहे. पण वास्तवात हे कौतुक नसून मराठा आरक्षणासंदर्भात मांडण्याच्या आग्रही भूमिकेबाबत लावलेला खोचक टोला आहे. ‘ही वेळ एकमेकांवर दोषारोप करण्याची नाही, तर एखमेकांच्या मांडीला मांडी लावून, खांद्याला खांदा भिडवून मराठा, तसेच धनगर आरक्षणाचा गुंता सोडवण्याची आहे. भाजप नेत्यांनी यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मन वळवायला हवं. सध्या मोदींनी मनात आणलं तर अशक्य ते शक्य होण्याचा काळ आहे. पण मराठा आरक्षणाची कोंडी फोडण्यासाठी वेळ द्या, असं पंतप्रधानांना पत्र पाठवूनही वेळ मिळत नसेल, तर राज्य सरकारला दोष देण्याचा भाजपच्या पुढाऱ्यांना अधिकार नाही’, असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

सातारचे उदयनराजे भोसले यांनी ‘मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल, तर सगळ्याच समाजांचे आरक्षण रद्द करा’, अशी भूमिका घेतलेली असताना कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मात्र ‘मराठा समाजाच्या आड येणाऱ्यांना ठोकून काढा’, असं म्हटलं आहे. या दोन्ही राजांनी वेगवेगळी भूमिका घेतल्याचं विरोधकांकडून सांगितलं जात असताना ही भूमिका एकच असल्याचं सामना अग्रलेखातून शिवसेनेनं मांडलं आहे.

- Advertisement -

‘या त्या दोघांच्या स्वभावाच्या ठिणग्या आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असं खासदार संभाजी राजे सांगत आहेत. धनगर, आदिवासी, इतर मागास वर्गाच्या तोंडचा घास काढून आपल्याला काही नको, असं मराठा समाजाचं म्हणणं आहे. सरकारनं जे केलं ते सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं नाही. त्यामुळे समाजात निराशा आणि वैफल्य आलं आहे. त्याच उद्विग्नतेतून उदयनराजेंनी सगळ्यांचंच आरक्षण रद्द करा, गुणवत्तेनुसार मेरिटवर सर्वांची निवड करा अशी भूमिका घेतली. कोल्हापूर आणि सातारच्या छत्रपतींनी आता घेतलेल्या भूमिका मूळच्या शिवसेनेच्याच आहेत. सातारा तसेच कोल्हापूरच्या ‘राजां’नी घेतलेल्या भूमिकांचा वेगळा अर्थ कुणी काढू नये’, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -