घरताज्या घडामोडीरुग्णांलयांपाठोपाठ भाजी मार्केटचेही निजंर्तुंकीकरण

रुग्णांलयांपाठोपाठ भाजी मार्केटचेही निजंर्तुंकीकरण

Subscribe

करोनाच्या विषाणुंचा संसर्ग रोखण्यासाठी आता रुग्णालया पाठोपाठ भाजी मार्केटमध्येही निजंर्तुंकीकरण करण्यात येणार आहे.

करोनाच्या विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेची प्रमुख रुग्णांलयांसह उपनगरीय रुग्णालयांच्या परिसरात सोडियम हायड्रोक्लोराईड पाण्यात मिसळून फवारणी केल्यानंतर बुधवारी काही मोठ्या भाजी मार्केटमध्ये याची फवारणी करत मार्केटचा परिसराचे देखील निजंर्तुंकीकरण करण्यात आले. बुधवारी पाच प्रमुख मार्केटमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी ही फवारणी केली आहे. शिवाय महापालिका मुख्यालयासह महापालिकेच्या विभागीय महापालिका कार्यालयांचे बुधवारी निजंर्तुंकीकरण करण्यात आले.

५४ मार्केटमध्ये केली जाणार फवारणी 

करोना विषाणुचा पसार आता झपाट्याने वाढत असून सध्या संपूर्ण मुंबई आणि देशात लॉकडाऊन असले तरी भाजी आणि कडधान्ये खरेदीसाठी भुसारी दुकाने सुरु आहे. बाजारांमधील अर्थात मार्केटमध्ये सध्या भाजी आणि इतर वस्तू खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी होत असल्याने येथील गाळेधारकांसह खरेदीला येणाऱ्या ग्राहकांना या विषाणुची लागण होवू नये, म्हणून या मार्केटचा परिसर निजंर्तुंक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी दहा मार्केटच्या परिसरात अग्निशमन दलाच्या जवानांनी सोडियम हायड्रोक्लोराईड पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा कार्यक्रम आखला होता. त्यापैंकी बुधवारी मिर्झा गालिब मार्केट, ग्रँटरोड येथील एल.टी मार्केट, अंधेरी पश्चिम येथील दत्ताजी साळवे मार्केट आणि कुर्ला येथील लक्ष्मणराव यादव मंडई आदींमध्ये सोडियम हायड्रोक्लोराईड पाण्यात मिसळून फवारणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यात या मार्केटमध्ये फवारणी केली जात असली तरी एकूण ५४ अशाप्रकारच्या मार्केटमध्ये फवारणी केली जाणार आहे. त्यामुळे उर्वरीत मार्केटमध्ये गुरुवारी व शुक्रवारी फवारणी करुन ही या मार्केटचे निजंर्तुंकीकरण केले जाणार असल्याची माहिती बाजार विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिले आहे.

- Advertisement -

मुख्यालयांसह वॉर्ड ऑफिसेसमध्ये फवारणी

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मंगळवारी फवारणी करत रुग्णालय इमारतीचा परिसर निजंर्तुंक केल्यानंतर, बुधवारी महापालिकेची मुख्यालय इमारत आणि विभागीय कार्यालयांमध्येही अशाप्रकारची फवारणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या महापालिका कार्यालयांमध्ये अशाप्रकारची फवारणी करतानाच जनतेचा सहभाग आणि गर्दी असलेल्या मार्केटकडे महापालिकेने प्राधान्याने लक्ष वेधून घेतले आहे. केवळ महापालिकेचे मार्केटच नाही तर ज्या रस्त्यांवर घाऊक बाजार भरतो तिथेही फवारणी करण्यात आलेली आहे.

नगरसेवकांचाही सहभाग

पंतनगर घाटकोपर येथे करोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे या परिसरात मुंबई अग्निशमन दलाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी फवारणी करून घेत संपूर्ण परिसर निजंर्तुंक केला. विशेष म्हणज राखी जाधव यांनी महापालिकेच्या ‘एन’विभागाला १५ मशीन्स आणि जंतुनाशक दान केले. यामाध्यमातून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना विभागात फवारणी करता येईल. तसेच मुलुंड येथील भाजप नगरसेविका रजनी केणी यांनीही आपल्या विभागात अशाचप्रकारे फवारणी करून घेण्यासाठी सहभाग नोंदवला आहे.

- Advertisement -

हेही  वाचा – घाबरु नका! आता फक्त २ रुपयात गहू आणि ३ रुपयात तांदूळ मिळणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -