घरमुंबईअभिनेता संजय दत्त रासपमध्ये जाणार

अभिनेता संजय दत्त रासपमध्ये जाणार

Subscribe

रासपच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अभिनेता संजय दत्त याच्या पक्षप्रवेशाबाबत दावा केला आहे.

विधानसभा निवडणूकांपूर्वीच अनेक नेत्यांच्या पक्ष प्रवेश, पक्षाला सोडचिठ्ठी आदी घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच आज राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बॉलीवूड अभिनेता संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. एवढ्यावरच न थांबता येत्या २५ सप्टेंबर रोजी अभिनेता संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात आता आणखी एका पक्षप्रवेशाची चर्चा मात्र रंगली आहे.

हेही वाचा – २५० भारतीयांची बहरीनच्या तुरुंगवासातून सुटका होणार

मेळाव्याला पंकजा मुंडेंची उपस्थिती

दादरच्या शिवाजी पार्क मैदानात राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले. वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्याला महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. या मेळाव्यातच महादेव जानकर यांनी संजय दत्तच्या पक्षप्रवेशाबाबत माहिती दिली. दरम्यान अभिनेता संजय दत्त याने व्हिडीओच्या माध्यमातून रासपला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे महादेव जानकर यांची माहिती आणि संजय दत्तच्या शुभेच्छा यामुळे संजय दत्त खरंच रासपमध्ये जाणार का? अशी चर्चा सध्या रंगली आहे.

- Advertisement -

संजय दत्तने दिल्या रासपच्या वर्धापनदिलाला शुभेच्छा

संजय दत्तने दिल्या रासपच्या वर्धापनदिनाला शुभेच्छा

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 25, 2019

संजय दत्तच्या रासपला शुभेच्छा

दरम्यान वर्धापन दिनानिमित्त अभिनेता संजय दत्त याने रासपला एका व्हिडीओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. महादेव जानकर हे आपल्या भावासारखे असल्याचे त्याने या व्हिडीओत म्हटले आहे. तसेच मी आता येथे असतो तर नक्कीच रासपच्या मेळाव्याला हजेरी लावली असती, असंही त्याने या व्हिडीओत म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -