घरमुंबईअवनीला मारले ते गाव हागणदारीमुक्त नव्हते - निरुपम

अवनीला मारले ते गाव हागणदारीमुक्त नव्हते – निरुपम

Subscribe

गावातील १३ नागरिकांचा वाघिनीच्या हल्ल्यात बळी गेला, त्यातील बहुतेक जण गावाच्या बाहेर शौचास गेले होते. गावात शौचालय असते तर त्यांच्यावर ही वेळच आली नसती, असे संजय निरुपम म्हणाले.

महाराष्ट्र हागणदारीमुक्त एकीकडे घोषणा करत असताना अवनी वाघिणीला ज्या गावात मारले गेले ते गावच हागणदारीमुक्त नव्हते, असा आरोप मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. या गावातील ज्या १३ नागरिकांचा वाघिनीच्या हल्ल्यात बळी गेला, त्यातील बहुतेक जण गावाच्या बाहेर शौचास गेले होते. गावात शौचालय असते तर त्यांच्यावर ही वेळच आली नसती. गावकऱ्यांसोबतच अवनीचाही जीव वाचला असता, असे सांगत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

हेही वाचा – नियमानुसार अवनीला ठार केलं – मुनगंटीवार

- Advertisement -

काय म्हणाले संजय निरुपम?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला असल्याचा दावा सातत्याने करत असतात. महाराष्ट्राचे वन-पर्यावरणमंत्री व अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना संपूर्ण महाराष्ट्रात बांधलेल्या शौचालयांचा आकडा सांगतात. मात्र, आज त्यांच्याच चंद्रपूर जिल्ह्यात लोक उघड्य़ावर शौचास जात आहेत. सरकारच्या या अपयशामुळे आज एका अवनीला जीव गमवावा लागला. उद्या हीच वेळ दुसऱ्या अवनीवर आली तर काय करणार? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – अवनी वाघिणीच्या मृत्यूची चौकशी होणार: मुख्यमंत्री फडणवीस

- Advertisement -

अवनीच्या मृत्यूवर आरोप-प्रत्यारोप

अवनी मृत्यू प्रकरणावरून गेल्या दोन दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. एकीकडे मनेका गांधींनी या प्रकरणासाठी थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना जबाबदार धरत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. यावर मुनगंटीवार यांनी आपले मत स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे सत्तेत असलेल्या शिवसेनेनेही भाजपवर परखड टीका केली आहे. त्याचबरोबर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील सरकारवर टीका केली होती. आता यावर संजय निरुपम यांनीही सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवनीच्या मृत्यूवर राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे की काय? असाच प्रश्न राज्यातल्या जनतेला पडला आहे.


हेही वाचा – ‘म्हणून गोळी झाडली’, अवनी वाघीण प्रकरणाची तिसरी बाजू!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -