घरमुंबई'मोदी सरकारने बुलेट ट्रेनचा तमाशा बंद करावा' - संजय निरुपम

‘मोदी सरकारने बुलेट ट्रेनचा तमाशा बंद करावा’ – संजय निरुपम

Subscribe

'नरेंद्र मोदी जे बुलेट ट्रेनचा तमाशा दाखवत आहेत, तो त्यांनी बंद करावा. तसेच रेल्वेमंत्री पियुष गोयल हे जे हायस्पीड ट्रेनचे व्हिडिओ दाखवत फिरत आहेत. ते त्यांनी बंद करावे', असा घणाघात संजय निरुपम यांनी मोदी आणि रेल्वे मंत्र्यांना लगावला आहे.

मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेवरुन मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मोदी आणि रेल्वे मंत्र्यांना टोला लगावला आहे. ‘नरेंद्र मोदी जे बुलेट ट्रेनचा तमाशा दाखवत आहेत, तो त्यांनी बंद करावा. तसेच रेल्वेमंत्री पियुष गोयल हे जे हायस्पीड ट्रेनचे व्हिडिओ दाखवत फिरत आहेत. ते त्यांनी बंद करावे’, असा घणाघात संजय निरुपम यांनी मोदी आणि रेल्वे मंत्र्यांना लगावला आहे.

- Advertisement -

 

अशी घडली घटना

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन बाहेरील पादचारी पूल कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडली. या दुर्घटनेमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून ३४ जण जखमी झाले आहेत. या जखमींना सेंटजॉर्ज, जीटी आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर उपचार असून काहींची प्रकृत्ती चिंताजनक तर काहींची प्रकृत्ती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

ऑडिटनंतर ही पूल कोसळणे दुर्दैवीच

या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेंटजॉर्ज रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी माध्यामांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर ही पूल कोसळणे हे दुर्दैवीच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घटनेची प्राथमिक जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना दिले आहेत. तसेच आज संध्याकाळपर्यंत त्याचा अहवाल मुख्यंमंत्र्यांकडे सादर करण्यास सांगितले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री गिरीष महाजन देखील उपस्थित होते. तसेच रुग्णालयानंतर त्यांनी घटनास्थळाची देखील पाहाणी केली आहे.


वाचा – ‘हा’ पूल महापालिकेचाच; अखेर शिक्कामोर्तब

वाचा – जबाबदारी कोणाची हे निश्चित करा; मुख्यमंत्र्यांचे पालिका आयुक्तांना आदेश


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -