घरमुंबईकव्वालीमार्फत संजय राऊत यांचा भाजपवर पुन्हा निशाणा

कव्वालीमार्फत संजय राऊत यांचा भाजपवर पुन्हा निशाणा

Subscribe

संजय राऊत यांनी फेसबुकवर अझीज भाईंची कव्वाली शेअर केली आहे. या कव्वालीमार्फत त्यांनी भाजपवर निशाना साधला आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता १५ दिवस होऊन गेले आहेत. मात्र, अध्यापही राज्यात सत्ता स्थापन झालेली नाही. निवडणुकीत भाजपला १०५ जागांवर यश मिळाले आहे. तर शिवसेनेला ५६ जागांवर यश मिळाले आहे. दोन्ही पक्षांनी निवडणुकीपूर्वी युती जाहीर केली होती. मात्र, निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर अडून बसले आहेत. त्यांच्यातील हे मतभेद आता टोकाला गेले आहेत. याच मतभेदातून शिवसेनेचे नेते दररोज सोशल मीडियावर भाजपवर नाव न घेता टीका करत आहेत. फेसबुकवर त्यांनी अझीज भाईंची कव्वाली शेअर केली आहे. यासोबतच त्यांनी भाजपवर देखील निशाना साधला आहे. ‘लोक उगाच अहंकार आणि गर्वाने वागतात तेव्हा मला अझीज भाइची ही कव्वाली आठवते’, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

राऊत यांनी वाजपेयी यांचीही शेअर केली कविता

संजय राऊत यांनी ट्विटरवर अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेची ‘न दैन्यं न पलायनम्’ ही ओवी शेअर केली आहे. यासोबतच त्याचा अर्थ देखील त्यांनी थोडक्यात सांगितला आहे. ‘आता आव्हानांपासून पळायचे नाही तर संघर्ष करायचा आहे’, असे राऊत ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव असेल तरच बोला – संजय राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -