Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई ईडी चौकशीवरून संजय राऊतांचा व्यंगचित्राद्वारे केंद्र सरकारवर निशाणा

ईडी चौकशीवरून संजय राऊतांचा व्यंगचित्राद्वारे केंद्र सरकारवर निशाणा

हे व्यंगचित्र ईडी आणि सीबीआयसंदर्भातील असून सध्या विरोधकांमध्ये हे व्यंगचित्र चर्चेचा विषय ठरतोय

Related Story

- Advertisement -

शनिवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ट्वीटरवर एक व्यंग चित्र शेअर केलं. हे व्यंगचित्र ईडी आणि सीबीआयसंदर्भातील असून सध्या विरोधकांमध्ये हे व्यंगचित्र चर्चेचा विषय ठरत आहे. संजय राऊतांना तासाभरापूर्वी केलेल्या या व्यंगचित्रातून केंद्र सरकारवर निशाणा साधना साधला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत असेही म्हणाले की, ते व्यंग असून ज्याला समजले तसे त्या प्रकारे त्या चित्राचा बोध घेतील. मी ट्विट केलेलं व्यंगचित्र ही जनतेची भावना आहे. ज्यांना ते चित्र समजलंच नाही ते अधिक सूड भावनेने वागतील असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

यंत्रणांमार्फत होणाऱ्या राजकारणाचं स्वागत

- Advertisement -

दरम्यान महाराष्ट्र सरकारला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. केंद्रीय तपास यंत्रणेला हाताशी पकडून तसेच न्यायव्यवस्थेवर दबाव आणून अद्याप सूडाचं राजकारण सुरू आहे. असं असले तरी आम्ही याचे स्वागतच करतो आणि यासर्व प्रकाराला तटस्थपणे पाहतो, असेही राऊत म्हणाले. तसेच आम्हाला शुद्ध राजकारण हवं आहे. तपास यंत्रणांद्वारे आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये. ईडी चौकशीने काहींना विकृत आनंद मिळतो त्यांने तो घ्यावा. परंतू महाराष्ट्राची ही परंपरा नव्हे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ED, CBI ची कुत्र्यांशी तुलना

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापे मारले होते. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात सरनाईक कुटुंब ईडीच्या रडारवर आहे. या कारवाईनंतर शिवसेनेकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात येत आहे. ईडी आणि सीबीआय हे केंद्र सरकारच्या हातातील बाहुलं झाले आहे, अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली होती. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच एक व्यंगचित्र ट्विट केले आहे. या व्यंगचित्रात दोन कुत्रे उभे आहेत. त्यातील एका कुत्र्यावर सीबीआय आणि दुसऱ्या कुत्र्यावर ईडी असे लिहिले आहे. ही दोन कुत्रे महाराष्ट्राच्या वेशीवर उभे आहेत. “थांब, आता नक्की कोणाच्या घरी जायचं आहे ते अजून ठरलं नाहीये”, असं सीबीआय असं लिहिलेला कुत्रा ईडी लिहिलेल्या कुत्र्याला सांगताना दिसत आहे.


शिवसेनेचे हिंदुत्व संस्कृतीचे, विकृतीचे नाही!

- Advertisement -