घरमुंबईतंबाखूजन्य पदार्थांच्या बंदीसाठी दिवंगत माजी मंत्र्यांच्या पत्नीचा पुढाकार

तंबाखूजन्य पदार्थांच्या बंदीसाठी दिवंगत माजी मंत्र्यांच्या पत्नीचा पुढाकार

Subscribe

राज्याचे दिवंगत नेते माजी गृह आणि कामगारमंत्री सतीश पेडणेकर यांच्या पत्नी सुमित्रा पेडणेकर यांनी भारतीय तंबाखू कंपनी आयटीसीला पत्र पाठवून तंबाखू उत्पादन थांबवण्याची विनंती केली आहे.

तंबाखूच्या वाढत्या विक्री आणि सेवनामुळे व्यसनाचं प्रमाण वाढत असून त्यातून कर्करुग्णांचही प्रमाण वाढत आहे. सरकारने तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादनांवर बंदी घातली असूनही काही कंपन्या आजही खुलेआम विक्री करतात. याच पार्श्वभूमीवर राज्याचे दिवंगत नेते माजी गृह आणि कामगारमंत्री सतीश पेडणेकर यांच्या पत्नी सुमित्रा पेडणेकर यांनी भारतीय तंबाखू कंपनी आयटीसीला पत्र पाठवून तंबाखू उत्पादन थांबवण्याची विनंती केली आहे.

सुमित्रा पेडणेकर यांचे पती माजी गृह आणि कामगारमंत्री सतीश पेडणेकर यांचा २०११ साली तोंडाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. आपण ज्या परिस्थितीतून गेलो ती परिस्थिती आणखी कुणाच्या वाट्याला येऊ नये, यासाठी सुमित्रा यांनी तंबाखू विरोधी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून त्यांनी सर्व तंबाखू उत्पादन कंपन्यांना पत्र पाठवलं आहे आणि तंबाखू उत्पादन न करण्याची विनंती केली आहे.

- Advertisement -

लोकांच्या जीवावर बेतेल असा व्यवसाय बंद करा. यासाठी भारतीय तंबाखू कंपनी (आयटीसी) आणि अन्य तंबाखू उत्पादन कंपन्यांना पत्र पाठवून उत्पादन न करण्याची विनंती केली आहे. मर्चन्ट्स ऑफ डेथ ही मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेदद्वारे तंबाखू व्यसनाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती केली जाणार आहे. महिलांना विधवा आणि मुलांना अनाथ होण्यापासून कसं वाचवता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
– सुमित्रा पेडणेकर, सतीश पेडणेकर यांच्या पत्नी

तंबाखूशी संबंधित रोगामुळे दरवर्षी देशात दहा लाख लोकांचा मृत्यू होतो. तर, सिगारेट सेवन करणारी प्रत्येकी तिसर्‍या व्यक्तीचा मृत्यू होतो आहे. तंबाखू सेवनामुळे कर्करूग्णांमध्ये वाढ होत आहे. देशात होणार्‍या सर्वाधिक मृत्यूचं कारण कर्करोग आहे. या कर्करोगाची लागण होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेकांची कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. तंबाखू सेवन हे आरोग्यासाठी अतिशय घातक असताना त्याचं उत्पादन केलं जातं”, असंही पेडणेकर म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -