घरमुंबईपत्रीपुलाचा गर्डर टाकण्यासाठी शनिवार-रविवारी मेगा ब्लॉक

पत्रीपुलाचा गर्डर टाकण्यासाठी शनिवार-रविवारी मेगा ब्लॉक

Subscribe

कल्याण रेल्वे स्थानकाजवळील पत्री पुलावर रोड ओव्हर ब्रिज बांधण्याचे काम युध्दपाळीवर सुरु आहे. पत्री पुलाला ओव्हर ब्रिजसाठी मध्य रेल्वेमार्गावर 76.67 मीटर लांबीचे ओपन वेब गर्डर उभारण्यासाठी चार ट्रॅफिक व पॉवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यापैकी पहिल्या दोन ब्लॉकचे काम येत्या शनिवार आणि रविवारी हाती घेतले आहे. ब्लॉकदरम्यान दोन्ही दिवशी डोंबिवली ते कल्याण दरम्यानची लोकल वाहतूक बंद राहणार आहे. तसेच लांब पल्याच्या मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.

डोंबिवली ते कल्याण लोकल वाहतूक बंद

- Advertisement -

शनिवार 21 नोव्हेंबर सकाळी 10.15 ते दुपारी 2.15 पर्यंत पत्री पुलांवर गर्डर टाकण्यात येणार आहे. यादरम्यान डोंबिवली ते कल्याण स्थानका दरम्यान सकाळी 9.50 ते दुपारी 2.15 वाजेपर्यंत उपनगरी गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत कल्याण ते कर्जत / कसारा दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला / ठाणे / डोंबिवली दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील. तसेच लांब पल्याच्या मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहेत. तर रविवारी 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.50 ते दुपारी 1.50 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी देखील सकाळी 9.20 ते दुपारी 1.50 वाजेपर्यत डोंबिवली ते कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी 9.20 ते दुपारी 1.50 दरम्यान उपनगरी गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. या ब्लॉक कालावधीत कल्याण ते कर्जत / कसारा दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज ते कुर्ला / ठाणे / डोंबिवली दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील. तसेच रविवारी सुध्दा मध्य रेल्वेच्या लांब पल्याच्या मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -