घरमुंबईआपत्तीचा सामना करण्यासाठी शाळा सज्ज

आपत्तीचा सामना करण्यासाठी शाळा सज्ज

Subscribe

पालिकेच्या 660 मुख्याध्यापकांना आपत्कालिन प्रशिक्षण

देशभरात शाळांमध्ये झालेल्या विविध दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व विद्यार्थ्यांना आपत्कालिन परिस्थितीचा सामना करण्याचे प्रशिक्षण मुंबई महापालिकेकडून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महापालिकेच्या आपत्कालिन विभागाकडून तब्बल 660 शाळांमधील मुख्याध्यापकांना आपत्कालिन परिस्थितीचा सामना करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये 110 महापालिका अनुदानित शाळांच्या मुख्याध्यपकांचा समावेश आहे. तर उर्वरित शाळांना दिवाळीनंतर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सूरतमध्ये क्लासला लागलेल्या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळेतील मुलांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 11 जुलैपासून महापालिकेच्या आपत्कालिन विभागाकडून शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आतापर्यंत आठ बॅचेसमधून पालिकेच्या 10 विभागातील तब्बल 660 शाळांच्या मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये पालिकेच्या शाळांसह, पालिका अनुदानित, विनाअनुदानित व खासगी शाळांच्या मुख्याध्यापाकांचाही समावेश आहे.

- Advertisement -

हे प्रशिक्षण शिबिर 28 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. सर्व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक यांना मुख्याध्यापकांकडून प्रशिक्षण देण्यात आल्यानंतर प्रत्येक शाळेत मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. जेणेकरून विद्यार्थी व शिक्षक प्रशिक्षित झाले आहेत याची पडताळणी करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी प्रकाश चर्‍हाटे यांनी सांगितले.

असे असेल प्रशिक्षण

- Advertisement -

आग विझवणे, जखमी व्यक्तीला स्ट्रेचरवरून नेणे, आपत्कालिन परिस्थिती उपलब्ध साधनांच्या मदतीने स्ट्रेचर बनवणे, दोरीच्या साहाय्याने खाली उतरणे, धुरामध्ये कोंडल्यास श्वास घेण्यासाठी करावयाची उपाययोजना, लिफ्टमध्य अडकल्यास काय करावयाचे, फर्स्ट एड कसे करावे, फायर एक्स्टींग्युशर कसे वापरावे, ऑईल, गॅस, शॉर्ट सर्किट नेमके कशामुळे आग लागली आहे हे ओळखून उपाययोजना करणे याची माहिती देण्यात येत आहे. आपत्कालिन परिस्थितीत विद्यार्थी, शिक्षकांबरोबरच शाळेची मालमत्तेची सुरक्षित राहावी, लोकांमध्ये घबराट निर्माण होऊ नये व त्यांचे मनोधैर्य कायम राहावे यासाठी हे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -