घरमुंबईस्कूल व्हॅनला राजकीय वरदहस्त

स्कूल व्हॅनला राजकीय वरदहस्त

Subscribe

राजकीय कार्यकर्त्यांकडून पालकांची दिशाभूल

स्कूल बस ओनर्सने स्कूल व्हॅनविरोधात न्यायालयीन लढाई सुरू केली असताना आता या स्कूल व्हॅनना राजकीय वरदहस्त मिळत असल्याचे दिसून येत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय कार्यकर्ते स्कूल व्हॅनना आरटीओ व न्यायालयाच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसे फलक शाळेबाहेर लावून ते पालकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

स्कूल व्हॅनमध्ये सात मुले बसण्याची क्षमता असताना अनेक स्कूल व्हॅनचालक 13 मुलांना व्हॅनमधून शाळेत ने-आण करत होते. त्यामुळे अनेक मुलांना याचा त्रास होत असे. तसेच एखादी दुर्घटना घडल्यास व्हॅनमधून मुलांना बाहेर पडणे मुश्किल होत असे. त्यामुळे स्कूल व्हॅनमधून विद्यार्थ्यांची ने-आण करण्यावर बंदी घालण्यात यावी, यासाठी स्कूल बस ओनर्सने न्यायालयात धाव घेतली होती. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही व्हॅनमधून विद्यार्थ्यांची ने-आण करण्यास परवानगी दिलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे व्हॅनमधून बेकायदा विद्यार्थ्यांची ने-आण करणार्‍यांची कोंडी झाली आहे.

- Advertisement -

त्यामुळे व्हॅनमालकांनी राजकीय कार्यकर्त्यांच्या मदतीने व्हॅनवरील बंदीबाबत पुढाकार घेतला जात असल्याचा प्रचार केला जात आहे. असे फलक बोरिवली, कांदिवली, मालाड येथील विविध शाळांबाहेर लावण्यात आले आहेत. हे फलक पाहून पालकांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. फलकबाजीमुळे अनेक पालक आपल्या मुलांना पुन्हा व्हॅनमधून शाळेत पाठवण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांकडून पालकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -