घरठाणे१५ जानेवारीपर्यंत शाळा बंदच राहणार

१५ जानेवारीपर्यंत शाळा बंदच राहणार

Subscribe

राज्य सरकारचे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवे परिपत्रक , महापालिकांच्या शाळांचा निर्णय स्थानिक प्राधिकरणाकडे

कोरोनाच्या संसर्गामुळे बंद असलेल्या शाळा कधी सुरू होणार, असा प्रश्न प्रत्येक विद्यार्थी, पालकाला सतावत आहे. २३ डिसेंबरपासून शाळा सुरू होण्याची शक्यता असताना ती तारीख उलटून गेली तरी अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत. आता जानेवारी मध्यापर्यंत इयत्ता नववी ते बारावीपर्यंतची शाळा सुरू करण्याची तयारी राज्याच्या शिक्षण विभागाने केली आहे. मात्र, त्या सुरु करण्याबाबतचा अंतिम निर्णय स्थानिक प्राधिकरणाने घ्यायचा असेही निर्देशित केले आहे. त्यानुसार, संपूर्ण ठाणे जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा येत्या १ जानेवारीपासून सुरू करण्याचे निर्देश ठाण्याच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्‍यांनी दिले आहेत. तर मुंबई महापालिकेच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालये १५ जानेवारी पूर्वी सुरू होणार नाहीत, असे मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे.

शाळा सुरू करण्यासाठीचा अहवाल या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांना शिक्षण विभागाने नुकताच सादर केला. त्यात शाळा जानेवारीच्या मध्यात सुरू करण्यास संमती देण्यात आली आहे. मुंबई पालिका शिक्षण विभागाचा मुंबई आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यात आला आहे. शाळा सुरू करण्याबाबत शासनाच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाची तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. शासनाने जिल्हा स्तरावर निर्णयाचे अधिकार दिल्याने या जिल्ह्याच्या प्रमुखांकडून काय निर्णय घेतला जातो हे लक्षात घेऊन शाळा सुरू केल्या जातील, असे सांगण्यात आले.

- Advertisement -

कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून या शाळा १५ जानेवारीपर्यंत बंदच राहतील असे निर्देश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी खबरदारी म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा व महाविद्यालये १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेडून घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासोबत महत्त्वाची बाब म्हणजे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या पूर्वनियोजित पुरवणी परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येतील अशा सूचना महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -