कोजागिरीला मसाला दूध पिण्यामागील वैज्ञानिक कारण घ्या जाणून

आज कोजागिरी पौर्णिमा. आजच्या दिवशी चंद्राच्या शीतल प्रकाशात मसाला दूध तयार करुन पिण्याची परंपरा आहे. पण या परंपरेमागील वैज्ञानिक कारण जाणून घेणेही महत्वाचे आहे.

Mumbai
scientific reasons behind drinking milk on sharad purnima

आज भारतात कोजागिरी पौर्णिमा साजरी होत आहे. कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात मसाला दूध तयार करण्यात येते. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तयार करण्यात येणारे दूध आरोग्यदायी असते. चंद्राच्या शीतल उजेडात उघड्यावर तयार करण्यात येणारे दूधामागील वैज्ञानिक कारण जाणून घेऊया.

वैज्ञानिक कारण

मसाला दूध तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दूध आणि सुका मेवा वापरण्यात येतो. दुधात मोठ्या प्रमाणात लॅक्टीक अॅसिड आढळते. सुका मेवासुद्धा आरोग्यदायी असतात. कोजागिरी पौर्णिमेला चंद्राचा शीतल प्रकाश अधिक तीव्र असतो. या प्रकाशात मसाला दूध तयार करुन प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमे दिवशी रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशात मसाला दूध तयार करण्यात येते.

मसाला दूध पिण्याचे फायदे

मसाला दूध प्यायल्याने अनेक आजारांवर मात करण्यात येते. त्वचा रोग आणि दम्याच्या रुग्णांनी मसाला दूध पिणे फायदेशीर मानण्यात येते. त्वचा रोग रुग्णांनी या दिवशी मोकळ्या आकाशाखाली उघड्यावर चंद्राच्या शीतल प्रकाशात मसाला दूध करुन प्यावे. त्यामुळे त्वचाविकार दूर होतात, असे सांगण्यात येते. दृष्टिदोष असलेल्या रुग्णांनीसु्द्धा या दिवशी मसाला दूध तयार करुन प्यावे. कारण की या दिवशी चंद्राचा प्रकाश अधिक तीव्र असतो. चंद्र अधिक तेजस्वी असतो. तेव्हा दूध तयार करताना चंद्राला एकटक पहावे. असे केल्याने दृष्टिदोषात काही प्रमाणात सुधार होतो.