उर्मिला मातोंडकरांच्या सभेत भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ

उर्मिला मातोंडकरच्या सभेत काही नागरिकांनी नरेंद्र मोदींच्या नावाने घोषणाबाजी केल्या. त्यामुळे काँग्रेस आणि घोषणाबाजी करणारे एकमेकांसमोर भिडले होते. यादरम्यान काही काळ त्यापरिसरात तणाव निर्माण झाला होता.

Borivali
actress to politician journey of urmila matondkar
उर्मिला मातोंडकर

उत्तर मुंबई मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांची बोरीवली रेल्वे स्थानकाजवळ प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेदरम्यान काही लोकांनी नरेंद्र मोदींच्या नावे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यातून घोषणाबाजी करणारे आणि काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. त्यामुळे काही काळ त्याठीकाणी तणावाचे वातावरण होते. उर्मिला मातोंडकर यांचा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे. या प्रचाराच्या मार्फत उर्मिला संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहे. त्यामुळे आता इतर पक्षांना धास्ती बसली आहे. यासाठी इतर पक्षाचे कार्यकर्ते आता उर्मिलाच्या प्रचारामध्ये व्यत्यय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

‘ते भाजपचे भाड्याचे गुंड’

यासंदर्भात उर्मिलाला विचारले असता उर्मिलाने सांगितले की, सभेत गोंधळ निर्माण करणारे भाजपचे भाड्याचे गंड होते. या घटनेवर प्रतिक्रिया देताना उर्मिला मांतोडकर म्हणाले की, ‘परवानगी घेऊन सभा व्यवस्थित सुरु होती. परंतु, या सभेत भाजपचे गुंड घुसले. त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. आम्ही अगोदर याकडे दुर्लक्ष केलं. मात्र, त्यांनी अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली. त्यांनी महिलांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पकडण्यासाठी गेले असता सगळ्यांनी पळ काढला.’

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here