घरमुंबईमंत्रालयातून मिळाली ३ टन रद्दी

मंत्रालयातून मिळाली ३ टन रद्दी

Subscribe

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मंत्रालयातील सर्व मंत्र्यांची दालने रिकामी करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. या आदेशानंतर मंत्रालयात गेल्या दोन दिवसांपासून साफसफाईचे काम सुरु असून मंत्रालयात आतापर्यंत सुमारे ३ टन रद्दी मिळाली आहे.

ही रद्दी अखेर शुक्रवारी विकण्यात आली आहे. सुमारे एक ट्रक भरेल इतक्या या रद्दीने शुक्रवारी मंत्रालयातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अद्याप काही दालनांची साफसफाई शिल्लक असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही राजकीय पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केला नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यानंतर मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जाहीर करीत मुख्यमंत्र्यांसह राज्यातील सर्व मंत्र्यांना, त्यांची मंत्रालयातील दालने, कार्यालये, त्यासाठी पुरवलेल्या साहित्याचा ताबा देण्याचे आदेश दिले होते. सर्व मंत्र्यांना बुधवार संध्याकाळ साडेपाचपर्यंतची मुदत देण्यात आली होती.

त्यानंतर बुधवारपासून जवळपास सर्वच मंत्र्यांच्या दालनात साफसफाई सुरू झाली. फाईलींचा आढावा घेणे, आवश्यक फाईलींचा रेकार्ड करुन ठेवणे अशी कामे सुरू असतानाच अनावश्यक कागदपत्रांची फाडाफाडही करण्यात आली. त्यामुळे मंत्रालयात गेल्या दोन दिवसांपासून रद्दीचे ढिग तयार झाल्याचे चित्र दिसून आले होते. शुक्रवारी रद्दीने भरलेल्या गोण्या एकत्र करण्यात आल्या. रद्दीच्या ६३ गोण्या शुक्रवारी विकण्यात आल्या आहेत. एका गोणीमध्ये साधारण ४० ते ५० किलोच्या आसपास रद्दी होती. अशी सुमारे २ ते ३ टनच्या आसपास रद्दी गोळा करण्यात आली असल्याची माहिती पुढे आली आहे.

- Advertisement -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी गोळा झालेल्या रद्दी विकण्यात आली आहे. १० रुपये प्रति किलो या दराने ही रद्दी विकण्यात आली असून त्यातून सामान्य प्रशासन विभागाला सुमारे ३० ते ३५ हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -