घरमुंबईसागरी मासे झाले महाग

सागरी मासे झाले महाग

Subscribe

पावसाळ्यात समुद्रातील मासेमारी बंद असते. जे काही सागरी मासे मिळतात ते बर्फातले असतात आणि महाग होतात. त्यामुळे मुंबईतील मासे खव्वयांची गैरसोय होते

पावसाळ्यात समुद्रातील मासेमारी बंद असते. जे काही सागरी मासे मिळतात ते बर्फातले असतात आणि महाग होतात. त्यामुळे मुंबईतील मासे खव्वयांची गैरसोय होते. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा इतर राज्यातून मुंबईत येणार्‍या गोड्या पाण्याच्या माशांकडे वळवला आहे. त्यामुळे हे मासेही काहीसे महाग झाले आहेत. मात्र तरीही दादर, माहिम, भाईंदर येथील गोड्या पाण्याच्या मासे बाजारात गर्दी उसळल्याचे चित्र आहे.

पावसाळा हा मासे खाणार्‍यांसाठी कठिण काळ असतो. एकतर मासे मिळत नाहीत, मिळालेच तर ते प्रचंड महाग असतात. अशावेळी तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यातून येणारे गोड्या पाण्याचे मासे ही एक आशा असते. हे मासे ट्रकमधून येतात. ते प्रामुख्याने क्रॉफर्ड मार्केट, सेनापती बापट मार्गावरील मासे मार्केटमध्ये उतरवले जातात. त्यामुळे तेथे मासे खरेदी करणार्‍यांची एकच गर्दी उसळलेली असते.रोहू, कातला,पाला, मांगूर,शिवण्या यासारख्या अनेक गोड्या पाण्यातील मासे सध्या लोकप्रिय ठरत आहेत. ते मोठ्या संख्येने विकत घेतले जातात.


आम्ही आधी हे मासे १२० रुपये किलो या भावात विकायचो.मात्र आता खाणार्‍यांची संख्या वाढल्यामुळे त्यांचा भाव वाढला आहे. सध्या या माशांचा भाव १५० रुपये किलो झाला आहे.
सचिन परदेशी, मासे विक्रेता


आमच्या घरात रोज मासे खाण्याची सवय आहे. जेवणात जर का मासे नसतील तर पोर जेवत नाहीत. सध्या सागरी मासे बाजारात खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत आणि जे मिळतात ते खूप महाग आहेत. या करीता मग पर्याय म्हणून आम्ही गोड्या पाण्यातील मासे घ्यायला सुरुवात केली.
-मीनल कदम, गृहिणी

- Advertisement -

 होलसेल रिटेल (प्रतिकिलो)

मांगूर ११० — १५०
कातला १५० — १८०
बैकी १०५ — १३०
रहू १२५ – १५०
खवली ८० — १२०
परमी -१६० — १८०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -